शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आज येणार ‘अमृत’च्या आर्थिक अनियमिततेचा अहवाल

By admin | Updated: January 9, 2017 00:06 IST

महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

४० लाखांचा अपहार : कारवाईची शिफारस?अमरावती : महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे चौकशी अहवाल सोपविणार असून त्यांच्या अभिप्रायावर ‘अमृत’चे भवितव्य ठरणार आहे. लक्षावधीच्या अनियमिततेची जबाबदारीही अहवालातच निश्चित होणार असल्याने सुरक्षारक्षकांसह महापालिका वर्तुळाचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘जगदंबा’ संस्थेला काळ्या यादीत टाकल्यानंतर सुरक्षारक्षकांमधूनच ‘अमृत’ या सहकारी संस्थेचा उदय झाला. जगदंबा या एजन्सीकडून सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा मुद्दा त्यावेळी आयुक्तांच्या दालनात पोहोचला. त्यावर ‘तुम्हीच संस्था काढली तर कुणी नोकर राहणार नाही आणि कुणी मालक’ ,अशी भावना व्यक्त करीत अमृतची पायाभरणी सुकर करण्यात आली. सुरूवातीला सुरक्षारक्षकांच्या मानधनातून शासकीय अंशदान भरण्यात आले. मात्र, दोन महिन्यानंतर ‘अमृत’ संस्थेने जगदंबा या जुन्या संस्थेच्या पावलावर पाऊल टाकत सुरक्षारक्षकांची पाच-साडेपाच हजार रूपये देऊन आर्थिक पिळवणूक चालविली. ईपीएफ, ईएसआयसीचा भरणा करणे अनिवार्य असताना संबंधित अधिकाऱ्यांनी त्या चालान न पाहता अमृतच्या गोरखधंद्याला बळ दिले. आयुक्तांनी घेतली दखलअमरावती : महापालिकेकडून प्रती सुरक्षारक्षक ८७२६ रुपये मिळत असताना सुरक्षारक्षकांच्या हाती ५ ते साडेपाच हजार रूपये देऊन 'अमृत'ने स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. 'लोकमत'ने वृत्तमालिका चालवून हा आर्थिक गोरखधंदा उघड केला आहे. महापालिका आयुक्तांनी दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे २० डिसेंबर रोजी सोपविली होती. मात्र, शेटे हे स्वच्छ सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीत लागले असल्यामुळे अहवाल देण्यास उशीर झाला आहे. अखेर हा बहुप्रतीक्षित अहवाल ९ जानेवारीला येणार आहे. स्वयंस्पष्ट अहवालात अमृतवरील संभाव्य कारवाईचा उहापोह केला जाणार आहे. सुरक्षारक्षकांमध्ये खदखद तब्बल ४९ टक्के कपात करुन अल्प मानधन तेही दोन-तीन महिन्यानंतर हाती येत असल्याने सुरक्षारक्षकांमधील असंतोष वाढू लागला आहे. अमृत संस्थेने खुशाल ईपीएफ आणि ईएसआयसीची रक्कम कपात करावी. मात्र, त्या मोबदल्यात ईपीएफच्या स्लिप आणि ईएसआयसीमधून मिळणारा आरोग्यलाभ किमान द्यावा,अशी अपेक्षा सुरक्षारक्षकांद्वारा व्यक्त केली जात आहे.