शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

पुन्हा दमदार पाऊस, शेतकऱ्यांसाठी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:06 IST

जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञाचा अंदाज : हवामान प्रणाली पावसाचा अनुशेष भरून काढणार

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २० सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचा अनुशेष भरून निघण्याचे संकेत आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून सध्या मध्य भारतासह बहुतांश ठिकाणी मान्सून कमकुवत आहे. एकूण पावसाची सरासरी तूट ९ टक्केपर्यंत पोहोचली आहे. परंतु, आता थोडी आशेची किरणे दिसत असून मंगळवारपर्यंत मध्य व उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनच्या समुद्रात सक्रिय दोन चक्रीवादळे 'बारीजात आणि मानगूट', बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत. परंतु त्यांची शक्ती कमी होत असून, हे दोन वादळे बंगालच्या उपसागरातील पूर्व भागात एकत्र आल्याने चक्राकार वारे तयार झाले आहेत. ही हवामान प्रणाली सोमवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्रात परावर्तीत होईल. सदर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन ते पश्चिम-दोशेने प्रवास करण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. परंतु या प्रवासात हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सिस्टीम पश्चिम मध्यप्रदेश पर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत हमी नाही. वरील सर्व स्थितीनुसार २० तारखेपासून ओरिसा आंध्र या भागात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, तर मध्य भारतातसुद्धा याचा फायदा होईल. शक्यतोवर पूर्व विदर्भात यामुळे २१ ते २४ चांगला पाऊस पडेल, तर पश्चिम विदर्भात मात्र कमी जास्त प्रमाण राहील. हे कमी दाबाचे क्षेत्र जर २१, २२ सप्टेंबरपर्यंत टिकले, तर मात्र अमरावती बुलडाणा भागातसुद्धा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातपुडा क्षेत्रात या पावसाच्या पाण्याने धरणे भरण्यास मदत होईल.जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसरविवारी दुपारी १.३० ते २.३० वाजता दरम्यान जिल्ह्यातील काही परिसरात तुरळक पावसाच्या सरी बसरल्या. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवली.