शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेर्‍यातील ट्रॉमा केअरचे लोकार्पण रखडले

By admin | Updated: May 22, 2014 23:24 IST

बडनेरा : बडनेर्‍यातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले. मात्र अद्यापपर्यंत हा दवाखाना प्रशासनाने सुरू केलेला नाही.

बडनेरा : बडनेर्‍यातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले. मात्र अद्यापपर्यंत हा दवाखाना प्रशासनाने सुरू केलेला नाही. निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे सहा महिन्यापर्यंत या दवाखान्याचा मुहूर्त निघणार नसल्याचे चिन्ह आहे. इमारतीच्या देखभालीमागे लाखो रुपये खर्च होत आहे. १६ आॅक्टोबर २०११ रोजी बडनेर्‍यात ट्रामा केअर युनिट या दवाखान्याची इमारत उभारणीचे काम आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, आमदार रवी राणा, तत्कालीन मनपा आयुक्त नवीन सोना, शल्य चिकीत्सक डॉ. सी. एल. सोनकुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाने सुरु करण्यात आले. त्यानंतर या इमारतीचे काम अवघ्या १५ महिन्यात पूर्ण करण्यात आले. ज्या घाईने हा दवाखाना उभारण्यात आला तेवढ्या घाईने मात्र या ट्रामा केअर युनिटला लोकांच्या सेवेत रुजू करण्यात आले नाही. परिणामी या इमारतीच्या देखभालीमागे वायफळ खर्च करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखाच्यावर विजबिल या इमारतीसाठी भरण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बडनेर्‍यातील ट्रामा केअर युनिट या दवाखान्याचे बांधकाम उभारुन दिले आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये रंगरंगोटीसह या दवाखान्याचे काम पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड वर्षापूर्वीचे जिल्हा शल्य चिकीत्सकांना इमारत ताब्यात घेण्याचे पत्र दिले होते. दीड करोड खर्च करुन शासनाने बडनेर्‍यात ट्रामा केअर युनिट उभारले आहे. बडनेरा शहराला जवळजवळ १०० खेडी जुळून आहेत. लगतच्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दरदिवसाला या भागातून गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यावे लागत आहे. अमरावतीच्या दवाखान्यांमध्ये नेत असताना कित्येकांनी रस्त्यातच दम सोडला आहे. बडनेर्‍यात ट्रामा केअर युनिट हा दवाखाना लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. दीड वर्षापासून उभारलेले ट्रामा केअर शोभेची वास्तु ठरत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा दवाखाना सुरू करता आला असता. पुढे विधानपरिषद, विधानसभा या दोनही निवडणुकांच्या आचारसंहिता सलग येणार आहे. सहा महिन्यापर्यंत बडनेर्‍यातील ट्रामा केअर युनिट हा दवाखाना सुरू होण्याचे कुठलेही संकेत नाही. (शहर प्रतिनिधी)