शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांकडे शासनाचे दुर्लक्ष - शेखर भोयर

By admin | Updated: June 15, 2014 23:14 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुलनेत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करून अनेक अन्यायकारक निर्णय शासनाने पारित केल्याचा आरोप,

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तुलनेत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करून अनेक अन्यायकारक निर्णय शासनाने पारित केल्याचा आरोप, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटना आणि उर्दू टिचर्स असोसिएशन पुरस्कृत उमेदवार शेखर भोयर यांनी केला.
राज्यातील तसेच अमरावती जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मतदारांनी कौल दिल्यास निवडून आल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवेन, असा संकल्पदेखील शेखर भोयर यांनी केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्येच्या निकषांमध्ये तफावत आढळून येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक तुकडीमध्ये विद्यार्थी संंख्येची कमाल मर्यादा अधिक असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्या बंद पडत आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. परिणामी शिक्षकाच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षकांच्या मानधनाबाबतही हीच तफावत आढळून येते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मानधनामध्ये सन २०११ मध्ये वृध्दी करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधनही वाढविण्यात आले. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये अत्यल्प वृध्दी करण्यात आली आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळेच शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी व शिक्षकांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी बोलताना शेखर भोयर यांनी केले.