शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉडर्न फॉर्मकोलॉजी’ अभ्यासक्रमास मान्यता

By admin | Updated: March 27, 2016 00:02 IST

कायद्यातील काही तरतुदीमुळे होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवा देताना अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करणे शक्य नव्हते.

अधिसूचना जाहीर : होमिओपॅथ करणार अ‍ॅलोपॅथीचे उपचारगजानन मोहोड अमरावतीकायद्यातील काही तरतुदीमुळे होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवा देताना अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करणे शक्य नव्हते. एकीकडे कायदा व दुसरीकडे रुग्णांच्या अपेक्षा यामध्ये होमिओपॅथीची घुसमट व्हायची. आता त्यांना रीतसर अ‍ॅलोपॅथीचा वापर करता येणार आहे. यासाठी त्यांना एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. येत्या आॅगस्ट २०१६ पासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी हा अभ्यासक्रम नवसंजीवनी ठरणार आहे. होमिओपॅथीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा वापर करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारा मॉडर्न फॉर्मकोलॉजी (आधुनिक औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत सुरू करण्याची अधिसूचना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांनी काढली आहे. त्यामुळे होमिओपॅथीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अ‍ॅलोपॅथीचा उपचार करता येणार आहे. त्यांना आधुनिक उपचार पद्धतीचा व्यवसाय करण्यास अनेक बंधने होती. ३० वर्षांपासून या होमिओपॅथची मागणी होती. आरोग्य सुविधा देणाऱ्या या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा वापर करण्याची अनुमती द्यावी यासाठी मोर्चा, निदर्शने, धरणे आदी मार्गाचा अवलंब करून संघटनांनी ही मागणी रेटून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये होमिओपॅथी डॉक्टरांनी एक वर्षाचा औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटीवर आधुनिक उपचार पद्धतीची मान्यता दिली होती व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचे आदेश दिले होते. आॅगस्ट २०१६ पासून शासकीय वैद्यकीय हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रममॉडर्न फॉर्मकोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. १०८ दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत होमिओपॅथी महाविद्यालयाकडे नोंदणी करून प्रवेश मिळणार आहे. सध्या १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ६० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासायापूर्वीच्या आघाडी सरकारने ९ जानेवारी २०१४ च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने महाराष्ट्र समचिकित्सा अधिनियम १९५९ व महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम १९६५ यामध्ये सुधारणा व दुरूस्तीसह विधेयक मंजूर करून शिक्कामोर्तब केले व आता आधुनिक औषधशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचे उपचार करता येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील ६० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. काय आहे ‘फॉरमॉकोलाजी’ ?आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत एक वर्षाचा फॉर्मकोलॉजी अ‍ॅन्ड क्लिनिकल कोर्स (आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण करावा लागणार आहे. सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी ५० हजार रूपये शुल्क राहणार आहे. येत्या आॅगस्ट २०१६ पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.