रुग्णवाहिका पळविणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा पुन्हा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:37+5:30

धमेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) असे इर्विनमधून पळालेल्या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास इर्विन रूग्णालयातून एक रुग्णवाहिका पळवून नेली होती. बडनेराच्या नवीवस्ती स्थित सिंधी कॅम्पमध्ये नागरिकांनी त्याला पकडून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सिटी पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्याला इर्विन रुग्णालयात दाखल केले.

Re-plant the 'that' patient who hijacked the ambulance | रुग्णवाहिका पळविणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा पुन्हा पोबारा

रुग्णवाहिका पळविणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा पुन्हा पोबारा

ठळक मुद्देरात्र निवारा केंद्रात होता मुक्कामी : महापालिका प्रशासन अनभिज्ञ, बडनेरा परिसरात संचार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातून बुधवारी सकाळी रुग्णवाहिका पळविणाऱ्या रुग्णाने महापालिकेच्या बडनेरा येथील निवारा कें द्रातून गुरुवारी पहाटे पोबारा केला. त्याला बडनेºयात अनेकांनी बघितले असून, नागरिकांमध्ये या प्रकरणाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हात फ्रॅक्चर असताना तो मुक्त संचार करीत आहे.
धमेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) असे इर्विनमधून पळालेल्या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास इर्विन रूग्णालयातून एक रुग्णवाहिका पळवून नेली होती. बडनेराच्या नवीवस्ती स्थित सिंधी कॅम्पमध्ये नागरिकांनी त्याला पकडून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सिटी पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्याला इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो रुग्णालयात असल्यास इतरांकरिता उपद्रवी ठरू शकतो. तो गंभीर आजारी नाही. याशिवाय फ्रॅक्चर हातावर उपचार करण्यात आले असल्याने अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी त्याला इतरत्र पाठविण्याची मागणी इर्विन प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधून केली. त्यानुसार, पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेच्या बडनेरा येथील निवारा केंद्रात त्याला पाठविण्यात आले.
धर्मेंद्र कथडेने गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास निवारा केंद्रातून पळ काढला. तो पुन्हा बडनेरा शहरात दाखल झाला असून, अनेकांना नवी वस्तीत दिसून आला. शरीरावर अपूर्ण कपडे, हात फ्र ॅक्चर अशा अवस्थेमुळे महिला, युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बडनेरा पोलिसांनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, महापालिका रात्र निवारा केंद्राचे व्यवस्थापन राजू बसवनाथे यांनी सदर रुग्ण येथे आलाच नाही किंवा तशी नोंद नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

पोलिसांना त्याला अन्य ठिकाणी ठेवण्याचे कळविले होते. त्यानुसार बडनेरा येथे बुधवारी निवारा केंद्रात पाठविले गेले.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक.

तो रुग्ण नॉर्मल होता. पोलिसांनी त्याला बडनेरा येथील रात्र निवारा केंद्रात सोडले. त्याच्या भावाशी आम्ही संपर्क केला. तो पाच ते सहा वर्षांपासून घराबाहेर आहे.
- शिवाजी बचाटे
निरीक्षक, सिटी कोतवाली.

Web Title: Re-plant the 'that' patient who hijacked the ambulance