शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रतन इंडियात बच्चू कडुंचे सीमोल्लंघन

By admin | Updated: October 13, 2016 00:32 IST

कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बुधवारी आ. बच्चू कडूंनी रतन इंडियात सीमोल्लंघन करीत त्रिशूल आंदोलन केले.

अमरावती - कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बुधवारी आ. बच्चू कडूंनी रतन इंडियात सीमोल्लंघन करीत त्रिशूल आंदोलन केले. प्रहारचे शेकडो कार्यकर्ते आणि रतनइंडिया मधील हजारो कर्मचाऱ्यांनी त्रिशूल आंदोलनामार्फत रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांवर प्रहार केला. पोलिसांच्या ताफ्याला न जुमानता आ.बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी कंपनी विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सीमोल्लंघन केले.आपल्या अनोख्या आंदोलनाने प्रसिद्ध असलेले अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांना रतन इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन दिले होते. रतन इंडियामध्ये कार्यरत विविध विभागातील तीस कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले, वेतनवाढ करण्यात आली नाही, कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्यावर बंदी, बोनस आदी महत्वाच्या मुद्द्यांवर बुधवारी रक्तदान करून त्रिशूल आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तारामाता मंदिराजवळून निघालेला मोर्चा रतन इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचताच पोलिसांनी अडविल्याने बच्चू कडू व पोलिसांमध्ये तू तू, मै मै झाली. वरिष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून वादावर पडदा टाकला. रतन इंडियामधील उत्पादन मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नाईलाजाने कर्मचारी कपात करावी लागल्याची माहिती कर्नल लोकेशसिंग यांनी दिली. मात्र मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात बच्चू कडू आक्रमक होताच लोकेशसिंग यांनी पंधरा दिवसात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना पदोन्नती, नियमानुसार वेतनवाढ, फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना कंपनीच्या पे रोल वर तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आश्वासनसुद्धा अधिकाऱ्यांनी दिले.यावेळी रतन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग, राठी, तहसीलदार सुरेश बगळे, नायब तहसीलदार नीता लबडे, धीरज मांजरे प्रहारचे छोटू महाराज वसु, शंभू मालठाणे, तालुकाप्रमुख जोगेंद्र मोहोड, निरंजन गावंडे, परवेज सौदागर,बाला शेरकर, चंदू खेडकर, गजानन मोहोड,शाम कडू, प्रदीप वडतकर,प्रदीप गुल्हाने, प्रदीप चांगोले सह शेकडो कार्यकर्ते, रतन इंडिया चे प्रकल्प ग्रस्त कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)