शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आरसीसी पिलरमध्ये अपहार

By admin | Updated: January 4, 2017 00:22 IST

वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची ...

निविदाविनाच कामे : वडाळी वनविभागाचा प्रताप, वरिष्ठांचे दुर्लक्ष अमरावती : वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. निविदाविनाच कामे करुन वडाळी वनविभागाने अपहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वनजमिनींवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षण कुं पण करताना वनांच्या सीमा निश्चितीसाठी आरसीसी पिलर लावण्याची नियमावली आहे. त्यानुसार सन २०१५ मध्ये वडाळी वनविभागाने जुने बायपास, वडाळी, वडरपुरा, पंचशीलनगर, आशियाना क्लब, वीटभट्टी परिसरात आरसीसी पिल्लर लावले आहे. मात्र हे आरसीसी पिल्लर लावताना अतिशय निकृष्ट दर्जाचे निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे हे पिल्लर वर्षभरात तुटू लागले आहेत. आरसीसी पिलर लावताना वनविभागाने नियमांना बगल दिली आहे. शासन निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कामे ही ई-निविदा प्रक्रि येद्वारे होणे अपेक्षित आहे. मात्र वडाळी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी मजूर लावून कामे केल्याचे देयके सादर करताना दर्शविले आहे. सुमारे ४०० आरसीसी पिलर लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र ६०० रुपये आरसीसी पिलर उभारणीसाठी लागले नसताना वडाळी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी १२०० रुपये याप्रमाणे देयके काढण्याचा प्रताप तक्रारीत नमूद आहे. वनजमिनींच्या सीमा दर्शविताना आरसीसी पिलरचा दर्जा चांगला असावा, यासाठी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र आरएफओंनी वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिल्लर लावण्याची किमया केली आहे. आदिवासी मजूर लावून पिल्लर उभारण्यात आल्याचा दावा वडाळी आरएफओ करीत असले तरी केवळ अपहारासाठी निकृष्ट साहित्य वापरुन आरसीसी पिलर लावल्याचे स्पष्ट होत आहे. देयकांची उचल करताना पिल्लरची साफसफाई व रंगविणे यात अपहार झाल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी) काय करतात सीसीएफ, डीएफओ, एसीएफ ? वडाळी हा परिसर शहरात असून दरदिवसाला वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची ये- जा सुरुच राहते. मात्र वनजमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिलर उभारण्यात आले असताना याकडे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या लक्षात ही बाब येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असताना आर्थिक अपहाराचे प्रकरण घडत असले तरी हे वरिष्ठ वनाधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरित आहे.