इर्विनमध्ये मुलीच्या उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST2021-03-04T04:24:06+5:302021-03-04T04:24:06+5:30

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये मुलीच्या उपचारार्थ आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ...

The rape of a woman who came to Irvine for the treatment of a girl | इर्विनमध्ये मुलीच्या उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

इर्विनमध्ये मुलीच्या उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये मुलीच्या उपचारार्थ आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली.

शाहरुख खान वल्द सलीम खान (२४, रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी मुलगी आजारी असल्याने तिला वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये भरती केले होते. फिर्यादी महिला व तिची मुलगी वाॅर्ड समोर जेवण करीत असताना आरोपीने मोबाईल कानाला लावून फिर्यादीकडे वाईट नजरेने सतत पाहून वाॅर्डात जाताना तिचा पाठलाग केला. तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. सदर प्रकार पाहून ती ओरडल्यामुळे येथील सुरक्षा रक्षक व लोकांनी आरोपीला पकडून युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: The rape of a woman who came to Irvine for the treatment of a girl