शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

राम मेघे अभियांत्रिकीतील ८५ कर्मचाऱ्यांना डच्चू

By admin | Updated: May 10, 2014 02:29 IST

येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेमधील ८५ कर्मचाऱ्यांच्या ....

अमरावती : येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेमधील ८५ कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून नव्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना डच्चू देण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे संदीप मेघे यांना मोठा धक्का असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा निर्माण झालेल्या शिक्षण संस्थाचे जाळे विदर्भात शिवाजी शिक्षण संस्थेनंतर दुसर्‍या क्रमांकाचे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, दंत महाविद्यालय, तांत्रिकी महाविद्यालयासह कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या अनेक शाखा आहेत. मात्र कालांतराने कार्यकारिणीत सदस्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाले. पदाधिकारी नियुक्ती असो की महाविद्यालयात कर्मचार्‍यांच्या नियुक्त्याचा वाद न्यायालयात पोहचला. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संदीप मेघे यांच्या विरुध्द कार्यकारिणीतील सदस्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने संदीप मेघे यांनी कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींची नियुक्ती रद्द करुन जुन्याच सदस्य संख्येच्या आधारे नव्याने कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मार्च २०१४ मध्ये कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अखेर संदीप मेघे आणि त्यांच्या समर्थकांना कार्यकारिणीतून बाहेर व्हावे लागले. मात्र संस्थेचे प्रकरण न्यायालयात सुरु असताना या दरम्यान संदीप मेघे यांनी केलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्त्यांवर कुºहाड कोसळली आहे. १३ डिसेंबर २०११ पर्यंत संदीप मेघे यांच्या कार्यकारिणीने कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या किंवा आर्थिक व्यवहाराविषयीचे निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाचे बंधन होते. तरीदेखील मेघे यांनी अध्यक्षपदावर असताना राम मेघे अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेत चक्क ८५ कर्मचार्‍यांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्या. आर्थिक व्यवहारही झाल्याचा विद्यमान कार्यकारिणीचा आरोप आहे. नातेवाईकांचा गोतावळा सांभाळण्यातच संदीप मेघे मग्न राहिलेत, न्यायालयाचे बंधन त्यांनी पाळले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त जागांचा भरणा करुन संस्थेवर आर्थिक भुर्दंड त्यांच्यामुळेच वाढला ही वस्तुस्थिती निर्माण झाली असल्याचाही आरोप होत आहे. (प्रतिनिधी)