शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशन करणार महिलांचा सन्मान

By admin | Updated: June 3, 2015 00:24 IST

राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच ...

अमरावती : राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच राजमाता फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच महिलांना राज्यस्तरीय राजमाता अहल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्कार दिला जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोप महात्मे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.अहल्यादेवी यांनी केलेल्या कार्याने सर्वत्र जे नावलौकिक मिळविले ते पाहता शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला. धनगर समाजाच्या या महिलेने जे कर्तृत्व केले ते सर्व समाजाने वाखाणण्याजोगे आहे. या उद्देशाने राजमाता अहल्यादेवी फाउंडेशनतर्फे पाच विविध क्षेत्रातील महिलांची निवड समितीने निवड केली आहे. यामध्ये 'माहेरची साडी' या मराठी चित्रपटात सामाजिक संदेश देणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल, क्रिडा क्षेत्रात हव्याप्र मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या माधुरी चेंडके, वैद्यकीय व समाज कार्यात योगदान देणाऱ्या स्मिता कोल्हे, उद्योग क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या उज्ज्वला हावरे, आणि प्रशासकीय सेवेत नावलौकिक प्राप्त करणाऱ्या संगीता धायगुडे या पाच महिलांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पत्रपरिषदेला फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गणेश काळे, सचिव माधुरी ढवळे, अशोक गंधे, जानराव कोकरे, कीर्ती खन्ना उपस्थित होते. (प्रतिनिधी)