७० वर्षीय वृद्धाचा रहिमापूर पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:08+5:302021-02-05T05:33:08+5:30

फोटो - २८ एस वानखडे वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावातून हरविलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील वृद्धाचा जळगाव खांदेश ...

Rahimapur police search for 70-year-old woman | ७० वर्षीय वृद्धाचा रहिमापूर पोलिसांनी घेतला शोध

७० वर्षीय वृद्धाचा रहिमापूर पोलिसांनी घेतला शोध

फोटो - २८ एस वानखडे

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावातून हरविलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील वृद्धाचा जळगाव खांदेश येथे शोध घेऊन रहिमापूर पोलिसांनी त्यांना आप्तांच्या स्वाधीन केले. त्यामुळे कुटुंबीयांचे हास्य परतले आहे.

नामदेवराव बाजीराव नाईक (७०, रा. भटोरी, ता. मूर्तिजापूर) असे पोलिसांनी शोधून आणलेल्या वृद्धाचे नाव आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वडाळगव्हाण येथून ते एक महिन्यापूर्वी हरविले होते. ते येथे नातेवाइकाकडे आले होते. रहिमापूर पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून घेतली आणि शोधकार्यास प्रारंभ केला. वायरलेसवरून संदेश दिले गेले. त्यावरून जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी अशा वर्णनाचा इसम त्यांच्या हद्दीत भटकंती करीत असल्याचे कळविले. ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी सुरेंद्र रायबोले व नागोराव जऊळकर यांनी मुक्ताईनगर गाठून नामदेवराव यांना ताब्यात घेतले व रहिमापूर ठाण्यातून नातेवाइकांच्या स्वाधीन केले. यादरम्यान नामदेवराव नाईक यांनी जळगाव खान्देश कसे गाठले, याबाबत स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Rahimapur police search for 70-year-old woman