शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या टोकनसाठी पहाटे ४ वाजतापासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

आरोग्य यंत्रणेकडून गुरूवार, शुक्रवार अशा दोन दिवसांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डचा १६ हजार २०० एवढा साठा केंद्रावर पोहचविण्यात आला. त्यापैकी ग्रामीण भागात काही केंद्रावर शुक्रवारी लस संपली होती. त्यामुळे आता शनिवार, रविवार असे पुन्हा दोन दिवस केंद्रावर लसींचा ठणठणाट असणार आहे. लसींचे वाटप केंद्रावर मागणी आणि वापरानुसार करण्यात येत आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींनाच लस दिली जात आहे.

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी तासानुसार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता बहुतांश नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहे. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील केंद्रावर लसींचा तुटवडा असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. आता १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांच्या लसीकरणास ब्रेक लावण्यात आला आहे. परंतु, ४५ वर्षावरील नागरिकांची लस टोचून घेण्यापूर्वी टोकन प्राप्त करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. काही केंद्रावर पहाटे ४ पासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे.आरोग्य यंत्रणेकडून गुरूवार, शुक्रवार अशा दोन दिवसांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डचा १६ हजार २०० एवढा साठा केंद्रावर पोहचविण्यात आला. त्यापैकी ग्रामीण भागात काही केंद्रावर शुक्रवारी लस संपली होती. त्यामुळे आता शनिवार, रविवार असे पुन्हा दोन दिवस केंद्रावर लसींचा ठणठणाट असणार आहे. लसींचे वाटप केंद्रावर मागणी आणि वापरानुसार करण्यात येत आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींनाच लस दिली जात आहे. त्याशिवाय केंद्रावर होणारी गर्दी ही पुन्हा कोरोना फैलाव करणारी ठरत असल्याने तासानिहाय टोकनचे वाटप करण्यात येत आहे. लसीकरणासाठी टोकन देताना नागरिकांना आराेग्य कर्मचारी वेळ निश्चित करीत असून, त्याचवेळी लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक पहाटे लसीकरणास पसंती देत असून, टोकन मिळविण्यासाठी लांबलचक रांगा लागत आहे. 

शनिवार, रविवार असे दोन दिवस अमरावती महानगरातील १५ केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे. प्राप्त पाच हजार लसीनुसार नियोजन करण्यात आले आहे. केंद्रावर लसींची नोंदणी आणि मागणी विचारात घेण्यात लस पुरविली जात आहे.- विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस