शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या तपासणीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात ...

ठळक मुद्देकारागृहात नियंत्रण : सर्दी, ताप, खोकला, श्वसन रुग्ण शोधमोहिम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. येथील मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्यात नियमित तपासणीदरम्यान सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास असलेल्या कैद्यांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. कारागृहातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी याकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत.मुंबई विभागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाच कारागृहे ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखेडा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेल्या या पाचही कारागृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये कर्तव्य बजवावे लागत आहे. कर्तव्याच्या काळात कर्मचाऱ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे.कुटुंबीयांना काही समस्या निर्माण झाल्यास ते कारागृहात संपर्क साधू शकतील, त्याकरिता प्रशासनाकडून संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वाराला कारागृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीने सील करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच ते सील उघडले जातील, अशी माहिती आहे. मात्र, कोरोना विषाणूचे संकट गडद होत चालल्याने विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या आरोग्याची निगा राखली जात आहे. त्यानुसार कारागृहातील दवाखान्यात नियमित तपासणी केली जात आहे. विशेषत: सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास असलेल्या कैद्यांची काळजी घेण्यात येत आहे. गत १५ दिवसांपासून विशेष आरोग्य तपासणीत गंभीर स्वरूपाच्या आजाराचे कैदी निर्दशनास आले नाही, हे विशेष.अधिकारी, कर्मचाºयांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. कारागृहात ‘सोशल डिस्टन्सिंट’चे पालन करण्यात येत आहे. तसेच कैद्यांच्या नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्यात येत असून, काळजी घेतली जात आहे.- रमेश कांबळे, अधीक्षक,मध्यवर्ती कारागृह अमरावती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग