शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे मान्सूनपूर्व आढावा बैठक

By admin | Updated: May 10, 2014 00:44 IST

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवू नये, याकरिता प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहावे.

 विभागीय आयुक्तांचे आदेश

अमरावती : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवू नये, याकरिता प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहावे. आपत्ती निवारणासाठी २४ बाय ७ तत्त्वावर नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डी.आर. बन्सोड यांनी शुक्रवारी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपिठावर महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, अकोल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते. नदी, नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण करून राहणार्‍या नागरिकांना त्वरित हटविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. सर्व नगरपरिषदा, महानगर पालिकांनी शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करावी. तसेच इमारत मालकांना नोटीस बजावून सुरक्षेविषयक सूचना कराव्यात. पाणी साचणार्‍या भागात मोठ्या प्रमाणावर साफसफाई मोहीम राबवावी असेही त्यांनी पुढे सांगितले. आपत्ती निवारणासाठी प्रशासनाला साहित्य पुरविण्यात येते. यासर्व साहित्याच्या चाचपणीसाठी मॉकड्रील करावे. नादुरुस्त साहित्याची त्वरेने दुरुस्ती करावी किंवा नवीन साहित्याची मागणी नोंदवावी, जिल्ह्यातील पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलाव, गावतलाव आदी जलसाठ्यांची पाहणी करुन सुरक्षेची खात्री करुन घ्यावी, पाझर तलावांच्या सांडव्यांच्या दुरुस्तीची कामे ताबडतोब निकाली काढावीत, मंडळनिहाय पर्जन्यमापन १ जूनपासून सुरु करण्याचे आदेशही त्यांनी दिले. अमरावती महापालिका ही अमरावती विभागातील सर्व नगर पालिका व अकोला महानगर पालिकेसाठी आपत्ती निवारण साहित्य पुरविणारी नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे विभागातील नगरपालिकांनी आपत्ती निवारण साहित्याची मागणी नोंदवावी, असे महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी यावेळी म्हणाले. उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे विभागातील पुरस्थिती, आवश्यक उपाययोजना, कारणे, आपत्ती निवारण साहित्याची स्थिती आदींविषयी माहिती दिली. बैठकीला पोलीस उपायुक्त संजय लाटकर, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, उपायुक्त प्रीती देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप घुगल, जलसंपदा विभागाचे पांडे, विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)