शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

By admin | Updated: November 1, 2014 22:44 IST

शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च

अमरावती : शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाणार आहे.येथील पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त सुरेश मेकला, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी मोकाट जनावरे तसेच वराह यांचाही त्रास कसा कमी करता येईल, याबाबत मंथन करण्यात आले. अवैध होर्डिग्ज, अतिक्रमण, मोकाट वराह आदी बाबींविषयी कारवाई करताना विशिष्ट समुहाच्या रोषाला सामारे जावे लागते. अनेकदा महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील झाल्याची बाब यावेळी आयुक्त अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केली. पोलीस बंदोबस्त मिळाल्यास अवैध होर्डिग्ज, अतिक्रमण किंवा मोकाट जनावरांची कारवाई करणे सुलभ होईल, असेही ते म्हणाले. वाहतूक व्यवस्थेला महापालिका जबाबदार असून महत्वाच्या ठिकाणी आॅटो स्टॅड निर्माण करण्याचे ठरविण्यात आले. बसस्थानक परिसरात विस्कळीत वाहतूक सुधारण्यासाठी नव्याने आॅटो स्टॅन्ड तयार केले जाणार आहे. मिनी आॅटो स्टॅडच्या माध्यमातून आॅटोरिक्षा व्यवस्थित उभे राहतील व बसस्थानक परिसरात वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची काळजी देखील महापालिका व पोलीस प्रशासनाने या बैठकीत घेतली आहे.