धामणगावातील ग्रीन रन स्पर्धेत प्रेम निखार, चैताली बोदडे अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:11+5:302021-02-05T05:34:11+5:30

७२ वा प्रजासत्ताक दिन, ४०० स्पर्धकांचा सहभाग धामणगाव रेल्वे : बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रीन रन स्पर्धेत ...

Prem Nikhar, Chaitali Bodde Ajinkya in the Green Run competition in Dhamangaon | धामणगावातील ग्रीन रन स्पर्धेत प्रेम निखार, चैताली बोदडे अजिंक्य

धामणगावातील ग्रीन रन स्पर्धेत प्रेम निखार, चैताली बोदडे अजिंक्य

७२ वा प्रजासत्ताक दिन, ४०० स्पर्धकांचा सहभाग

धामणगाव रेल्वे : बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रीन रन स्पर्धेत धामणगावकरांंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेम निखार व चैताली बोदडे आपआपल्या गटांत अजिंक्य ठरले. जवळपास ४०० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला.

दत्तापूर पोलीस ठाणे, नगर परिषद व सद्भावना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला स्थानिक गांधी चौकातून सकाळी ६.३० वाजता ठाणदार ब्रम्हदेव शेळके, मुख्याधिकारी प्रशांत ऊरकुडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. सात किमी अंतराच्या पुरुष गटात प्रथम क्रमांक प्रेम दयाराम निखार (अंजनवती), द्वितीय क्रमांक निकेश रमेश मडावी( गव्हानिपाणी) व तृतीय क्रमांक रोशन बुधाजी गजभिये (अंजनवती) यांनी पटकाविला. पाच किलोमीटरच्या महिला गटात प्रथम पारितोषिक चैताली प्रशांत बोदडे, द्वितीय क्रमांक निधी राजेंद्र निंभोरकर तसेच तृतीय क्रमांक खुशी प्रफुल्ल बढिये हिने पटकाविले. मुलामुलींसाठी आयोजित दोन किमी अंतराची स्पर्धा काजल संतोष काळे, कीर्ती भातरराव उरकुडे व कोमल राजू काळे यांनी जिंकली. स्पर्धेनंतर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेसाठी सद्भावना ग्रुपचे बाबा ठाकूर, विनोद तलवारे, सतीष कांकरिया, संजय जांगडा, संजय सायरे, नितीन कनोजिया, राजकुमार पसारी, विशाल गांधी, शुभम बिडकर, किरण निस्ताने व नगर परिषदेचे किशोर बागवान, खराटे, युनूसखान, दत्तापुर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवशंकर खेडेकर, उपनिरीक्षक द्वारका अंभोरे यांच्यासह नगर परिषद , पोलीस व शाळा-महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Prem Nikhar, Chaitali Bodde Ajinkya in the Green Run competition in Dhamangaon