शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात बियाण्यांची टंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून, सन २०२०-२१ मध्ये ९६३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ...

दर्यापूर : तालुक्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र १४,५६५ हेक्टर असून, सन २०२०-२१ मध्ये ९६३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे पेरलं ते उगवलं नाही, ही समस्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजली आहे. त्यातच यावर्षी रोग व किडींचा प्रादुर्भाव, त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून, उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर यांनी केले आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामात शेतात सोयाबीनचे हिरवे पीक उभे होत असताना, अति पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना, परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता ढासळली, तर उत्पादनक्षमता मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काही कंपन्यांचे बियाणे शेतात पेरणीपश्चात उगवणक्षमतेत फेल ठरल्याच्याही घटना घडल्या आहेत. सोबतच खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या होत्या. अशा विविध कारणांमुळे पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अशात ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबीन आहे, त्यांनी ते बियाणे जतन करून ठेवण्याची गरज आहे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे, त्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व आपल्या स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास येणाऱ्या अडचणींवर मात करता येऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यासोबत दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभावाने हे बियाणे विक्री केल्यास, त्यांनाही मदत होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरचे सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

बॉक्स :-

१० हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता

दर्यापूर तालुक्यात सोयाबीन पिकांचे अपेक्षित क्षेत्र १० हजार हेक्टर असून, त्यासाठी प्रतिहेक्टर १०० किलो बियाणे याप्रमाणे १० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. पुढील हंगामात येणारी बियाण्यांची संभाव्य टंचाई लक्षात घेता, तालुका कृषी विभागाने गत सप्टेंबर महिन्यापासून शेतकरी बांधवाला क्षेत्रीय स्तरावर मार्गदर्शन केले आहे.

कोट

यावर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून, उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.

- राजकुमार अडगोकर, तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर