शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल एक फेब्रुवारीला कार्यान्वित; शेतक-यांच्या कर्जखात्याला मिळणार विशिष्ट क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:30 PM

कर्जमुक्ती योजनेसाठी आयटी विभागाद्वारे १ फेब्रुवारीपासून मध्यवर्ती पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे.

अमरावती : कर्जमुक्ती योजनेसाठी आयटी विभागाद्वारे १ फेब्रुवारीपासून मध्यवर्ती पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. यात शेतक-यांची माहिती 'अपलोड' करण्याच्या कामाला सुरुवात होईल. बँकांसाठीसुद्धा पोर्टल १ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. यात बँकांनी 'एक्सेल टेम्पलेट'मध्ये तयार केलेली आधार संलग्न माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत 'अपलोड' करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी बुधवारी दिले.कर्जमुक्ती योजनेसाठी महसूल, सहकार विभागासह बँकांचे अधिका-यांसाठी असलेल्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. अपलोड केलेल्या माहितीवर पोर्टलद्वारे प्रक्रिया करण्यात येऊन या माहितीला योजनेचे निकष व अपात्रेचे निकषानुसार पात्र असलेल्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. उर्वरित आधार सलग्न कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्याचे दुसरे सत्र १६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत आणि करण्याचे तिसरे सत्र ६ ते २५ मार्च या कालावधीत पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक सत्रात प्रमाणिकरणासाठी यादी तयार करणे आणि लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी माहितीवर प्रक्रिया करण्याकरिता एकसारखी प्रक्रिया अवलंबण्यात येणार असल्याचे आभा शुक्ला म्हणाल्या.योजनेचे कार्यान्वयन योग्य पद्धतीने १ एप्रिलपूर्वी होईल, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक मशीनवर ठसे उमटत नाही, अशांसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मॅन्युअली माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येईल व लाभ दिला जाईल, असे शुक्ला म्हणाल्या.

 कर्जखात्याला राहणार ओळख क्रमांकबँकांनी आधारसंलग्न याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध कराव्यात. यामध्ये शेतक-यांच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला आहे. शेतक-यांंनी आधार कार्डसोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन कर्ज रकमेची पडताळणी करावी. कर्ज रक्कम मान्य असल्यास कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. कर्ज रक्कम, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आदी संदर्भात शेतक-यांची तक्रार असल्यास जिल्हासमितीसमोर मांडले जाईल व समिती अंतिम निर्णय घेऊन कार्यवाही करेल, अशी माहिती शुक्ला यांनी दिली.