शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

गावपुढाऱ्यांवर राजकीय गंडांतर

By admin | Updated: February 20, 2015 00:13 IST

तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून २८ गावांत २६२ सदस्य निवडले जाणार आहेत.

रोशन कडू तिवसातालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून २८ गावांत २६२ सदस्य निवडले जाणार आहेत. यापैकी १४४ महिला सदस्य निवडले जाणार आहेत. पुरुषांना मात्र ११८ जागा मिळणार आहेत. यातही पुन्हा अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या दोन संवर्गाचे आरक्षण आहेत. परिणामी गाव पुढाऱ्यांवर आता राजकीय गंडांतर येणार असल्याने हे पुढारी हवालदिल झाले आहे. तिवसा तालुक्यातील २८ गावांतील ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या प्रभाग आरक्षणावरील आक्षेपाची मुदत संपली आहे. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने महिला आरक्षण जाहीर केले आहे. २८ गावांतून एकूण २६२ सदस्य निवडून येतील. प्रभाग आरक्षणात यातील १४४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. २८ गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३०, अनुसूचित जमातीसाठी १०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३७ तर सर्वसाधारणसाठी ६७ अशा १४४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तिवसा ग्रामपंचायतीत १७ सदस्य असून त्यामध्ये ९ महिला आहे. मोझरी व वऱ्हा या ग्रा.प. १३ सदस्य असून त्यामध्ये ७ महिला राखीव आहेत. गुरूदेवनगर, शिरजगाव मोझरी येथे. ११ सदस्य आहेत. यामध्ये ६ महिला राखीव आहे. वरखेड, शेंदोळा खुर्द, मार्डा, शेदोळा बु., माळेगाव, भिवापूर, शेंदूरजना बाजार, शिवणगाव व सातरगाव या ग्रा.प. ९ सदस्य असून ३ जागा महिला आरक्षित आहेत. बोर्डा, सार्सी, मूर्तिजापूर, चेनुष्टा, धोत्रा, सुरवाडी, धामंत्री, वाठोडा खुर्द, भारवाडी, दापोरी, वणी, जावरा या ग्रा.प.त ७ सदस्य असून यामध्ये ४ आरक्षित आहेत. तळेगाव ठाकूर येथील १५ सदस्य ८ जागा तर कुऱ्हा येथील १७ जागा आहे. येथे ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहे.