आयुक्तालयात कार्यक्रम : वाढती गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्नअमरावती : नजीकच्या पोटे टाऊनशिप येथील गोविंदराव आदिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यलयातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आत्मरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूीमिवर महिला, मुलींनी कोणत्याही अत्याचाराला बळी न पडता अन्यायाचा प्रतिकार करावा. त्यासाठीची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, याकरिता हे प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य छाया बोळे यांच्या नेतृत्वात आयोजित हा कार्यक्रम पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. पीएसआय चव्हाण, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या मंगला परिहार, मार्गदर्शिका सुजाता झाडे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख सुजाता झाडे, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे जगदीश शिरपुरे यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य छाया बोळे यांनीही विद्यार्थिनींसोबत हितगुज साधून आत्मरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. महिला येणाऱ्या संकटांचा व अडचणींचा सामना करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. हा आत्मविश्वास निर्माण करण्याकरिताच हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणात विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणामुळे शहरातीील गुन्हेगारीवर अंकुश लावता येणार आहे.
पोलिसांकडून विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे
By admin | Updated: August 11, 2015 00:23 IST
नजीकच्या पोटे टाऊनशिप येथील गोविंदराव आदिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यलयातील इयत्ता आठवी ते बारावीच्या ...
पोलिसांकडून विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}