शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

विजयाच्या जल्लोषात पोलिसांची आडकाठी

By admin | Updated: February 16, 2015 00:18 IST

क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला.

अमरावती : क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला. परंतु मिष्ठान्नाचे वाटप सुरू असतानाच पोलिसांनी या क्रिकेटप्रेमींना तेथून हुसकावून लावले.त्यामुळे काही काळ वातावरण तणावसदृश झाले होते. या कारवाईने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने पोलिसांविरूध्द रोष निर्माण झाला होता. काहींनी तर चक्क ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा देखील दिल्या. देशभरात भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना शहरात मात्र पोलिसांनी आडकाठी केली. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांची अरेरावीअमरावती : सध्या देशावरच नव्हे तर जगावर क्रिकेटचा ज्वर चढलाय. विश्वचषकातील सर्वाधिक आकर्षण असते ते भारतविरूध्द पाकिस्तान या सामन्याचे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानला हरविण्याची परंपरा कायम ठेवल्याने देशभक्त क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. सामना संपताच क्रिकेटप्रेमी नागरिक व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. काही चिमुकले देखील हाती तिरंगे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना थांबवून मिष्ठान्नांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजकमल चौकातील वाहतूक सिग्नल बंद होते. शिवाय रविवारचा दिवस असल्याने वाहतुकही फारशी नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. जल्लोष सुरू होऊन अवघी १५ मिनिटे होत नाहीत तोच कोतवाली पोलिसांचा ताफा राजकमल चौकात पोहोचला. पोलिसांनी उत्साहात नाचणाऱ्या तरूणांना अडविले. इतकेच नव्हे तर ढोल-ताशे वाजविण्यासही मज्जाव केला आणि त्यांना चौकातून हुसकावून लावले. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नागरिकांची पोलिसांसोबत वादावादी झाली. बँड वादकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. पोलीस निघून गेल्यानंतर तेथे उपस्थित काही तरूणांनी ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्यात. तूर्तास याप्रकरणी कोणावरही गुन्हे नोंदविण्यात आले नव्हते.