शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेमाणी गोडाऊनमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: May 12, 2014 23:01 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊन परिसरासह

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊन परिसरासह शहरात ठिकठिकाणी ५00 पोलीस कर्मचारी-अधिकार्‍यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. १६ मे रोजी बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणी होईल. यासाठी शहरासह नेमाणी गोडाऊन परिसरात ५00 पोलीस कर्मचारी तैनात असतील. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात नेमाणी गोडाऊन येथे दोन पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, सात पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक, ४११ कर्मचारी, ४0 महिला कर्मचारी, सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या व विजयी मिरवणुकीत १४ पोलीस निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.

नेमाणी

मतमोजणीदरम्यान

गोडाऊनमध्ये मोबाईलला बंदी नेमाणी गोडावूनमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत. यापैकी एका प्रवेशद्वारातून शासकीय कर्मचार्‍यांना पहाटे ५ वाजता व दुसर्‍या प्रवेश दारातून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सकाळी ७ वाजता प्रवेश दिला जाईल. नेमाणी गोडाऊनमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीची मेटल डीटेक्टरद्वारे तपासणी होईल. मोबाईल, माचिस, गुटखा, दारु, सिगारेट लायटरवरही बंदी घालण्यात आली आहे.

बडनेरा

मतमोजणी

मार्ग १0 तास बंद राहणार दरम्यान बडनेरा-अमरावती मार्गावरील नेमाणी गोडाऊनसमोर शेकडो नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूक पहाटे ३ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात येईल.