शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचे घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व साहित्य अस्तव्यस्त आढळून आले.

ठळक मुद्देस्वावलंबीनगरातील घटना : मागील दाराचा कडीकोंडा उघडून चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वावलंबीनगरातील रहिवासी असणाऱ्या एका पोलिसाचे घर फोडून चोरांनी तब्बल ३ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. अशोक महादेवराव भुसारी (५२) हे शेगावचे दर्शन आटोपून रविवारी रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व साहित्य अस्तव्यस्त आढळून आले. त्यांनी बेडरूममधील आलमाऱ्यांची तपासणी केली असता, चोरांनी लॉकरमधील ४० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तेवढ्याच वजनाच्या दोन बांगड्या, १५ ग्रॅमचा गोफ, १० ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी ५ ग्रॅमचे कानातील अलंकार व अंगठी असे ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. गाडगेनगर पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता, चोरांनी घरामागील सर्र्व्हिस गल्लीतून प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. सोमवारी सकाळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी घटनास्थळाची तपासणी केली.

डॉग स्कॉड गेले २०० मीटरपर्यंतसोमवारी सकाळी श्वानपथक अशोक भुसारी यांच्या घरी आणले गेले. तेथील साहित्यांच्या गंध दिल्यानंतर श्वान घरापासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या हनुमान मंदिरापर्यंत पोहोचले. तेथे ठेवलेल्या खुर्चीला चारदा गवसणी घातली. मात्र, त्यापुढे श्वान गेले नाही.सळाखीने उघडला मागील दाराचा कडीकोंडाभुसारी यांच्या घरामागील आवारात बाथरूम व शौचालय आहे. त्यालाच लागून लोखंडी चॅनल गेट आहे. मात्र, वरचा भाग उघडा आहे. त्यामुळे चोरटे सर्व्हिस गल्लीतून भुसारी यांच्या घरामागील बाथरुमवरून आवारात शिरले. मागील दाराच्या गॅपमध्ये त्यांनी लोखंडी सळाखीने कडीकोंडा उघडला.

टॅग्स :Thiefचोर