शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विम्यासाठी शेतकऱ्यांनी भरले पावणेचार कोटी

By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST

शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या

गजानन मोहोड - अमरावतीशासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या १९ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ८५ लाख ३ हजार रुपये या पीक विम्यासाठी सक्तीने कापण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांत रोष आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतिपाऊस, नैसर्गिक आपत्ती, आदिवासी शेतकऱ्यांना टोलमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई, सामूहिक स्वरुपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात १९९९ ते २००० पासून ही योजना लागू केली. महसूल मंडळ युनिट गृहित धरुन त्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो. परंतु मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील पिकाची स्थिती, निसर्गाची अवकृपा यावर किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळाले हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची की कंपनीच्या हिताची अशी चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने जुलै अखेर खरीप हंगामास सुरुवात झाली. मात्र या योजनेची मुदत ३१ जुलै २०१४ रोजी संपली. शासनाने योजनेला १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु ३१ जुलैनंतर पेरणी झालेल्या पीक क्षेत्रास ही योजना लागू केली. वाढीव विमा संरक्षण देय ही तरतूद नसणाऱ्या या योजनेची मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजेच उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहणार आहे. मुदतवाढीनंतर बँकांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०१४ पर्यंत वाढविण्यात आली. यामध्ये कापूस पिकाच्या विमा दरात अंशत: बदल केला गेला आहे. या विमा योजनेत जिल्ह्यातील ९ राष्ट्रीयकृत बँकांत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले, अशा १९ हजार ७५ शेतकऱ्यांचे ८५ लाख ३ हजार रुपये सक्तीने विमा हप्त्यापोटी कापण्यात आले.