मोर्शी येथील शिवाजी शाळेत खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:14+5:302021-02-05T05:34:14+5:30

मोर्शी : स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत ७२ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आठ महाराष्ट्र ...

Players felicitated at Shivaji School, Morshi | मोर्शी येथील शिवाजी शाळेत खेळाडूंचा सत्कार

मोर्शी येथील शिवाजी शाळेत खेळाडूंचा सत्कार

मोर्शी : स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत ७२ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आठ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीशी संलग्न एनसीसी पथकाने मानवंदना दिली व व चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

मुख्याध्यापक ए.एन. चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समिती सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य एन.एस. गावंडे, दिनेश अर्डक, शाळा निरीक्षक एम.डब्ल्यू. चौधरी, दिवाकर कोठीकर, विधळे, पर्यवेक्षक एस.एन. गुर्जर, आर.एम. देशमुख, शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत देशमुख उपस्थित होते. एनसीसी कॅडेट अनुष्का गारपवार हिने देशभक्तीपर गीत सादर केले. याप्रसंगी ग्रीन रन स्पर्धत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल अनुक्रमे जान्हवी भगत व राशी आजनकर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन एस.आर. ठाकरे, प्रास्ताविक एम.आर. देशमुख वआभार ए.जी. हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते.

Web Title: Players felicitated at Shivaji School, Morshi