शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्डा ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर तळेगाव दशासरपासून पश्चिमेकडे जाणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर एक खड्डा आहे. दर महिन्यात येथे कधी ट्रक पलटी होतात, तर कधी दुचाकीचा अपघात होतो.

ठळक मुद्देआठ जणांचा बळी : दर महिन्याला उलटते जडवाहन, प्रशासन, पदाधिकाऱ्यांचा लक्षवेध

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : रस्ते तयार केल्यानंतर खड्डे पडण्याचा अनुभव नवा नाही. मात्र, काही खड्डे हमखास प्राणहानीला कारणीभूत ठरतात. नागपूर-औरंगाबाद सुपर एक्स्प्रेस हायवेवर एका खड्ड्यात जडवाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत या एकाच खड्ड्याने तब्बल आठ जणांचे बळी घेतल्याचे वास्तव आहे.नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर तळेगाव दशासरपासून पश्चिमेकडे जाणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर एक खड्डा आहे. दर महिन्यात येथे कधी ट्रक पलटी होतात, तर कधी दुचाकीचा अपघात होतो. आतापर्यंत या खड्ड्यात आठ लोकांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाने हा खड्डा एक वर्षात अनेक वेळा दुरुस्त केला. सुपर एक्सप्रेस हायवेची दुरुस्ती केल्यानंतर किमान एक वर्ष तरी रस्त्याची स्थिती चांगली राहते. मात्र, खड्डा नियमित दुरुस्त करूनही लगेच आठ दिवसांत गुडघाभर खोल जातो. बांधकाम विशेष प्रकल्पाचे अधिकारीही या खड्ड्यामुळे हतबल झाले आहेत.अपघाताच्या घटनांत वाढघुईखेड मार्गावरून तळेगाव दशासरकडे येताना नागमोडी वळणावर समांतर जागेत तो खड्डा आहे. बहुतांश जड वाहने येथे उलटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खड्ड्यात पडल्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. दरवर्षी तेथे तीन ते चार अपघात होतात. त्यात काही जखमी, तर काहींचा मृत्यू झाला.खड्डा आम्ही दुरुस्त केला. हा सुपर एक्स्प्रेस हायवे आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दुरुस्तीची कामे तेच करतात.- प्रमोद कोहळे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर- तर हा खड्डाही नसतातळेगाव दशासर ते निमगव्हाण हा पूर्वीचा पांदण रस्ता होता. त्या काळात या घुटकी नाल्याजवळ दलदल होती. त्यावेळीही पावसाळ्यात या रस्त्याने जाताना अनेकांचा जीव गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. काळ्या मातीची खोलवट जागा असल्याने हा खड्डा नेहमी तयार होतो. यंत्रणेने दखल घेतली असती, तर हा खड्डा तयार झाला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक