शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडी ‘पिकनिक’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय निवास्थानी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारावर एकमताने शिक्कामोर्तब करण्याचे ठरले.

ठळक मुद्देसोमवारी निवडणूक : अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे काऊंटडाऊन सुरू, विरोधकांच्या तलवारी म्यान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी ६ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीपर्यंत सदस्य एकत्र राहावे, याची पुरेपूर खबरदारी घेत महाविकास आघाडीने आपल्या सदस्यांना शुक्रवारी पर्यटनवारीवर पाठविले आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय निवास्थानी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारावर एकमताने शिक्कामोर्तब करण्याचे ठरले. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, अनंत साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, नाना वानखडे, धनंजय बंड, बाळासाहेब भागवत, उमेश घुरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ कुकडे तसेच नेते व सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेस गटनेते बबलू देशमुख, तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे दत्ता ढोमणे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सभागृहात काँग्रेस २६, राष्ट्रवादी काँग्रेस (हर्षवर्धन देशमुख गट) २ आणि शिवसेनेचे ३ अशी सत्तारूढ आघाडीची स्थिती आहे. दोन सदस्य नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यसंख्या ५७ राहिली आहे. सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर हा २९ आहे. आघाडीकडे ३२ सदस्य आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप व मित्रपक्षही सत्ता काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. पुरेसे संख्याबळ जुळत नसल्याने विरोधकांच्या गोटात शांतता आहे.अन्य पक्षांचे सदस्यही गळाला !जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसोबत अन्य काही सदस्य संपर्कात आहेत. तेसुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आकडा बहुमतापलीकडे जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद