शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तापाने फणफणतोय जिल्हा

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे.

अमरावती : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील चार आठवड्यातच तापाचे २५५१ रुग्ण दाखल झाले असूनही यामध्ये डेंग्यू, मलेरिया, निमोनिया व टायफाईड आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. याकडे आता आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ताप व डायरियाची प्रतिबंध करण्याकरिता डास निर्मूलन व दूषित पाण्याचा वापर टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात १ हजारांच्यावर तापाचे रुग्ण दाखल झाले होते. दर दिवसाला ५० ते ६० रुग्ण नुसत्या ताप आजारांचे दाखल केले जात होते. हीच स्थिती पुढेही पहायला मिळत आहे. १८ ते १४ सप्टेंबरदरम्यान ही संख्या मोठ्या संख्येत वाढल्याचे दिसून येत आहे. या चार आठवडयामध्ये २५५१ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. आॅगस्ट मध्ये डेंग्युचे १३ रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा डेंग्युचे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १८ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत टायफाईटचे १००९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे टायफाईडच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मलेरियाचे १४८१, निमोनियाचे १६ व गॅस्ट्रोचे ( डायरिया) ३८० रुग्ण दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तापाचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यावासी ताप आजारांने फणफणत आहे, असे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरात एक तापाचा रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तापाचा प्रभाव वाढता आहे.