शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात बोगस चालानद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा

By admin | Updated: May 4, 2017 00:07 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागात एकाच क्रमांकाचे दोन चालान आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

एकाच क्रमांकाचे दोन चालान : लेखा विभागातर्फे कारवाईची शिफारसअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागात एकाच क्रमांकाचे दोन चालान आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वित्त व लेखा विभागाने दोन विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पुनर्मुल्यांकनासाठी सादर आवेदनासोबत एकाच क्रमांकाच्या दोन चालान आढळून आल्या आहेत. मात्र, चालानवर अक्षरी व आकड्यात रकमेबाबत तफावत असल्याने हे प्रकरण लेखा विभागाने पुढील चौकशीसाठी गोपनीय विभागाकडे पाठविले होते. गोपनीय विभागाने चौकशीनंतर दोन चालान बनावट असल्याचा अहवालदिला आहे. यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र, ही कारवाई कोणत्या विभागाने करावी, याबाबत एकमत होऊ शकले नाही. परीक्षा, लेखा आणि गोपनीय विभाग बनावट चालानप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. एकाच क्रमांकाच्या दोन चालानवर वेगवेगळे शुल्क भरण्यात आल्याचे दिसून आले आहे. एकाच क्रमांकाच्या चालानवर ४०५ आणि ४११ अशी रक्कम असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. बोगस चालानवर रक्कम लिहिताना ृआकड्यात व अक्षरात खोडतोड करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. बोगस चालान प्रकरण हे दोन विद्यार्थ्यांना भोवणार आहे. मात्र, परीक्षा विभागात पुनर्मुल्यांकनासाठी सादर अर्जासोबत बोगस चालान जोडले जात असताना संबंधित कर्मचाऱ्यांना ते दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.दोन विद्यार्थ्यांच्या चालानची रक्कम जमा झाली नसल्याने ते तपासले असता हे चालान बोगस असल्याचे स्पष्ट झाले. परीक्षा विभागाशी संबंधित प्रकरण असल्याने त्याच विभागाने कारवाई करावी, असे अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाईबाबत शेरा नोंदविला आहे.- शशीकांत आस्वलेवित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठ