शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST

शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव

महापालिका सदस्य आक्रमक : वाहनतळाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी
अमरावती : शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव जागेवर असलेले अतिक्रमण का हटविले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन ‘भ्रष्टाचारी’ अशी उपमा देत महापालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली शनिवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पीठासीनावर उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. सभेच्या प्रारंभी शहर बस समिती सदस्य नियुक्तीवरुन वादळ उठले. राष्ट्रवादीचे सुनील काळे आणि अविनाश मार्डीकर यांच्यात सदस्य निवडीच्या पत्रावरुन शाब्दिक वादही झाला. अखेर महापौरांनी राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना या गटात नेतेदाचा वाद कायम असल्याने हा विषय पुढच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
अवैध होर्डींग्जचा मुद्दा गाजला
प्रदीप दंदे यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्याचे सांगून सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र काही सदस्यांच्या मागणीवरुन संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली. बाजार परवाना विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रशासनाच्यावतीने उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा विषय वेळेवर सभागृहात आणला. याला सदस्यांनी कडाडून विरोध केला. दिनेश बूब यांनी याचा विरोध करीत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच ताशेरे ओढले.
राजू मसराम, सुजाता झाडे यांनी अवैध होर्डिग्ज उभारण्याबाबतचा मुद्दा मांडला. प्रदीप बाजड, अरुण जयस्वाल, प्रदीप हिवसे, अमोेल ठाकरे, अजय सामदेकर, प्रशांत वानखडे, हमीद शद्दा हे प्रशासनावर तुटून पडले. अमोल ठाकरे यांनी शाम टॉकीज जवळील वाहनतळाच्या जागेवर असलेले अतिक्रमणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत अधिकाऱ्यांचा अक्षरश: वर्ग घेतला. वाहनतळासाठी राखीव असलेले अतिक्रमण काढण्यासाठी काय अडचण आहे? हा मुद्दा प्रदीप बाजड, प्रदीप हिवसे यांनी रेटून धरला. बाजड यांनी जुने दाखले देत या जागेप्रकरणी झालेल्या ‘तोडी’चा विषय उपस्थित केला. मात्र आता तोडातोडीचा विषय आला. महापौर चरणजित कौर नंदा यांना सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी अशा उपमा देत आम्ही तुम्हाला मर्दानी म्हणून बघतो, असे म्हणत प्रदीप बाजड यांनी काही तरी निर्णय द्या, असे म्हणाले. मात्र ही जागा शासनाची आहे, असा न्यायालयाचा निर्णय २३ सप्टेंबर २०१४ चा आहे. मात्र अतिक्रमण धारकांना कोर्टातून स्थनगादेश आणण्याची संधी प्रशासनाने दिली, असा आरोप अरुण जयस्वाल यांनी केला. (प्रतिनिधी)