शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथियांनी केले ‘गीतांजली एक्सप्रेस’चे पूजन

By admin | Updated: October 13, 2016 00:24 IST

दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून बडनेरासह परिसरातील तृतीयपंथियांनी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजीनला हार घालून तिची पूजा केली.

दसऱ्याचे औचित्य : ढोल-ताशांच्या गजरात बडनेराहून रवानाबडनेरा : दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून बडनेरासह परिसरातील तृतीयपंथियांनी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजीनला हार घालून तिची पूजा केली. तसेच ढोलताशंच्या गजरात गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकाहून रवाना केले. प्रवासी रेल्वेगाड्यांमधून तृतीयपंथीयांना रोजगार मिळतो. देशभरातल्या रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी नागरिक उपजिविकेसाठी फिरतात. प्रवाशांकडून पैसे मागून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच या गाड्यांच्या भरवशावर वर्षभर उदरनिर्वाह होत असल्याने कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता दसऱ्याच्या दिवशी तृतीयपंथी नागरिकांनी हा उपक्रम राबविला. बडनेराच नव्हे तर अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, येथील तृतीयपंथियांनी एकत्र येऊन हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. बडनेरा स्थानकावर ढोल -ताशांच्या गजरात गीतांजली एक्सप्रेसचे स्वागत केले. इंजीनची पूजा करण्यात आली. गाडीला अधिक वेळ न थांबविता तृतीयपंथियांनी हा उपक्रम राबविला. त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली नाही. तृतीयपंथियांनी रेल्वतील प्रवाशांना मिठाईचे वाटप केले. यावेळी शबनम, आम्रपाली, गुड्डी, तन्वी, शिल्पा, सीमा, खुशबू, महेक, राजकुमारी, मंगला आदींची उपस्थिती होती. गीतांजली एक्सप्रेसच्या चालकांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. यावेळी नवा उद्योग किंवा कोणत्याही उपक्रमाची सुरूवात केली जाते. त्यामुळे तृतीयपंथियांनी ज्या रेल्वेच्या माध्यमातून उदरनिर्वाह होतो, त्या रेल्वेचे पूजन करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. हा आगळा-वेगळा उपक्रम प्रवाशांनी देखील अनुभवला. (शहर प्रतिनिधी)