राष्ट्रीय हायस्कूल प्रकरणातील आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:52+5:302020-12-13T04:29:52+5:30

बाहेरच्या पानासाठी परतवाडा : नोकरीसाठी बनावट दस्तावेज सादर करून शासनाची दिशाभूल केल्याने अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलच्या संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य ...

Passed the accused in the National High School case | राष्ट्रीय हायस्कूल प्रकरणातील आरोपी पसार

राष्ट्रीय हायस्कूल प्रकरणातील आरोपी पसार

बाहेरच्या पानासाठी

परतवाडा : नोकरीसाठी बनावट दस्तावेज सादर करून शासनाची दिशाभूल केल्याने अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलच्या संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होताच ते भूमिगत झाले. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दी पब्लिक वेल्फेअर सोसायटी अंतर्गत शहरातील नामांकित राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक महाविद्यालयात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या शिक्षकपदासाठी संगनमताने आरोपींनी बनावट दस्तावेज सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे यांच्या आदेशाने सहायक लेखा अधिकारी नितीन दांडगे यांनी अचलपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले. ही माहिती होताच सर्व आरोपी पसार झाले आहेत. अचलपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात सोमवारी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

------------

Web Title: Passed the accused in the National High School case