शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

-तर पक्ष गुंडाळेल

By admin | Updated: September 30, 2014 23:28 IST

नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा

राज ठाकरे यांचे प्रतिपादन : दर्यापूर, वलगाव, चांदूररेल्वेत सभादर्यापूर/चांदूररेल्वे: नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा संधी देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मनसेच्या विदर्भातील पहिल्या प्रचार सभेची सुरुवात आज मंगळवारी दर्यापूर येथून करण्यात आली. दर्यापूर येथील सभेत त्यांनी आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांना फटकारले. सकाळी १०.३० ची सभा दोन तास उशिरा म्हणजे १२.३० वाजता सुरु झाली. त्यानंतर वलगाव व रात्री चांदूररेल्वे येथे जाहीर सभा झाली.सभेत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच या सरकारने पोलीस भर्ती घेतली. तरुणांना पाच-पाच कि.मी. धावायला लावले. यात चार तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलीस भर्तीसाठी आलेल्या मुलांवर पोलिसानांच लाठीचार्ज करावा लागत आहे. माझ्या विकास आराखड्यात तरुणांच्या नोकरी संदर्भातील व्हिजन आहे. सिक्युरिटी एजन्सीजमार्फत परप्रांतीयांना भर्ती करुन घेतले जाते. मराठी मुलांना काम मिळत नाही. मंत्र्यांंवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले विदर्भासारख्या सुपीक भागाचे काय केले यांनी, फक्त नागर फिरवला आहे. पाणी देवू, रास्ते देवू, नोकऱ्या देवू आता ते कोठे गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विदर्भात सर्वात जास्त संत्रा उत्पादित होतो. जगात संत्र्यांचा रस ७० टक्के लोक पितात व हे व्यापारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परंतु यांना संत्र्यांवर प्रक्रिया करण्याची एक ही कंपनी विदर्भात आणता आली नाही. कापूस इकडे सुतगिरणा कोल्हापुरात, जे जिथं पिकतं तेथे उद्योग आणाचे नाही? परंतु मी असे करणार नाही, जिथे उद्योग तेथे कारखाना आणणार, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून दिले. व्यासपीठावर शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे सहसंपर्क अध्यक्ष रावसाहेब कदम, बबन धामोतकर, जिल्हा संघटक पप्पू पाटील, राजेंद्र गायगोले, प्रवीण तायडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष जयंत वाकोडे, अंजनगावचे सुधाकर फुलंबरकर, शकुंतला शिंदे, भूषण फरतोडे, दर्यापूरचे गोपाल चंदन, अकोटचे प्रदीप गावंडे, मूर्तिजापूरचे रामा उंबरकर, अकोल्याचे पंकज साबळे, अचलपूरचे प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.