शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा व्हिडिओ कांड : अयानचे आक्षेपार्ह व्हिडिओ चोरणाऱ्या उजेरवर नवा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:56 IST

Amravati : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाड्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या मोबाइलमधील न्यूड व्हिडिओ चोरून ते व्हायरल करणारा आरोपी उजेर खान याच्यावर परतवाडा पोलिसांनी रविवारी रात्री अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लैंगिक छळ केल्याचा नवा गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाड्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या मोबाइलमधील न्यूड व्हिडिओ चोरून ते व्हायरल करणारा आरोपी उजेर खान याच्यावर परतवाडा पोलिसांनी रविवारी रात्री अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लैंगिक छळ केल्याचा नवा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी समोर आलेल्या १५ वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, या जबाबातून तपासाला अपेक्षित ठोस दिशा मिळेल, असे ठोस काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांना दिली.

व्हिडिओ कांडाचा मास्टरमाईंड अयान अहमद (१९, रा. परतवाडा) याचा मित्र असलेला आरोपी उजेर खान इकबाल खान (वय २०, रा. अचलपूर) याने अयानच्या मोबाइलमधील पीडित मुलींचे व्हिडिओ व फोटो चोरून स्वतःच्या मोबाइलमध्ये घेतले आणि ते इतर सहा जणांना फॉरवर्ड केले होते. या गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत असतानाच त्याच्यावर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. उजेर हा परतवाडा येथील एका १६ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करून तिला मोबाइलवर संपर्क साधून त्रास देत होता. मुलीच्या पालकांनी समज देऊनही त्याने हे कृत्य सुरूच ठेवले. अखेर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक छळवणुकीसाठी पाठलाग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, १३ एप्रिल रोजी रात्री अयान अहमदविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत यात एकूण आठ आरोर्पीना अटक करण्यात आली आहे. यातील मानव सुगंधे याने अयानला आपला अमरावती शहरातील भाड्याचा फ्लॅट तासिका तत्त्वावर दिला होता. तेथे त्याने दोन मुर्लीचे लैंगिक शोषण करून त्याचे रेकॉर्डिंग केल्याचे निष्पन्न झाले होते. तर उजेर याने अन्य पाच जणांना ते व्हिडीओ व फोटोग्राफ्स फॉरवर्ड केले होते.

पीडितेच्या जबाबाने पोलिसांची निराशा

या प्रकरणातील आठ पीडित मुर्लीपैकी एका १५ वर्षीय पीडितेने समोर येऊन जबाब नोंदवला. १८ एप्रिल रोजी विशेष तपास पथकातील महिला पोलिस अधिकारी तसेच महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आलेला हा जबाब मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या जबाबात अयान अहमद विरुद्ध गुन्हा दाखल होईल, असा कोणताही ठोस मजकूर आढळलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला घेरण्यासाठी पोलिसांना आता अधिक डिजिटल पुराव्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 'आम्ही तिला पुन्हा बोलते करण्याचा प्रयत्न करू,' असे एसपींनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

'थार' मधील व्हिडिओ, पिस्टलही रडारवर

मुख्य आरोपी अयान अहमद याच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 'थार' गाडीतील व्हिडिओचीही आता पोलिस चौकशी करणार आहेत. या व्हिडिओमध्ये आयफोन आणि पिस्तूलसारखी वस्तू दिसत असल्याने हे वाहन कोणाचे आहे आणि तो व्हिडिओ कधीचा आहे, याचा तपास पोलिस करणार आहेत. अयानची पोलिस कोठडी २१ एप्रिलला संपत असून पोलिस पुन्हा त्याच्या वाढीव कोठडीची मागणी करणार आहेत.

"आम्हाला वरिष्ठांकडून फॉरेन्सिक डेटा आणि डिजिटल अॅनालिसिसवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मिळाले आहेत. पीडितांची कॉन्फिडन्शियल सचिंग सुरू असून या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास केला जाईल. १५ वर्षीय पीडिताचे बयाण मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आले आहे."- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

English
हिंदी सारांश
Web Title : Paratwada video scandal: New case against Uzer for stalking minor girl.

Web Summary : Uzer Khan, accused of stealing and leaking Ayan's videos, faces a new charge for stalking a minor. Police are investigating Ayan's 'Thar' video and pistol. An additional eight people have been arrested in this case.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती