शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांवर पंचायत समिती सभापती नाराज

By admin | Updated: September 21, 2015 00:12 IST

जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच...

खंत : जिल्हा परिषद स्तरावर कामे होत नसल्याचा परिणाम अमरावती : जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता पंचायत समिती सभापतींनीही योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार जि.प. अध्यक्ष व सीईओंकडे तोंडी स्वरुपात व यापूर्वी लेखी निवेदनात केल्या आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या वाटपात पंचायत समिती सभापतींचाही विचार करावा, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे सभापती हे जि.प.चे पदसिद्ध सदस्य असतात. पंचायत समिती सभापती तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. असे असतानाही पदाधिकाऱ्यांकडून पंचायत समिती सभपतींना दुय्यम वागणूक दिली जाते. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व समितीचे सभापती तालुका सभापतींना विश्वासात घेत नाहीत. योजनांच्या अंमलबजावणीत पंचायत समिती सभापतींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवतात त्यांना सहभागी करून घेत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य असूनही योजनांच्या बाबतीत आमच्यावर अन्याय होत आहे. सर्व सभापतींना जिल्हा परिषद स्वनिधीतून तरतूद करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्व सभापतींना स्थान मिळावे, बांधकाम विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विकासकामात सदस्यांप्रमाणे पंचायत समिती सभापतींनाही निधी मिळावा, पंचायत समितीमधील अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत काम करीत आहेत, त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात आदी मागण्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)