शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत अभियानाला लागणार टाळे

By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST

पंचायतराज संस्थांचे बळकटीकरणासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाला टाळे

गंडांतर : जिल्ह्यातील पंचायत सशक्तीकरण अभियंत्यांची सेवा संपुष्टात अमरावती : पंचायतराज संस्थांचे बळकटीकरणासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाला टाळे ठोकण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ७५० हून अधिक अभियंत्यांच्या सेवा ३१ मे पासून संपुष्टात येणार आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील १९ पंचायत अभियंता आणि ९ गट अभियंत्यांना बसणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या पंचायत भवनाच्या बांधकामांनाही याची झळ पोहोचणार आहे. यावर राज्य शासनाने आतापर्यंत केलेला कोट्यवधींचा खर्चही पाण्यात जाण्याची शक्यता आहे. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण ही योजना सुरू केली होती. त्यात ग्रामीण भागात जेथे ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे त्या गावात पंचायत भवन बांधले जाणार होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्यांना पायाभूत प्रशिक्षण, नेतृत्व विकास, क्रांती ज्योती प्रशिक्षणाद्वारे महिलांना प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले जाणार होते. मात्र मागील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा यावर्षीचा निधी विद्यमान सरकारने दिला नाही.याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सदर योजनेचा निधी पूर्णत: गोठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सदर योजना देखील बंद पडण्याची शक्यता त्यावेळीच व्यक्त झाली होती. त्यात आता राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनतील अमरावतीसह राज्यभरातील जवळपास ७५७ अभियंत्यांनी सेवाही समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या कुुटुंबावर थेट उपासमारीची वेळ ओढवणार आहे. राज्य शासनाने २४ मार्चच्या परिपत्रकात या अभियानाचे स्वरुप बदलविण्याचे घोषित केले. मात्र आता १९ मे रोजीच्या शासन निर्णय फिरवत असेल तर राज्य पुन्हा बेरोजगारीच्या गर्तेत अडकला जाईल. या कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरीची व्यवस्था न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही- शशांक निचत, गट अभियंता.एकीकडे बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या शासनाने पंचायत अभियानातील पंचायत व गट अभियंत्याचा रोजगार हिरावून घेतला. त्यामुळे शासनाने केवळ दहा दिवसांतच आमच्यावर अन्याय केला आहे या अन्यायाविरोधात दाद मागू. - कांचन बनसोड, गट अभियंता.