शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांवर विद्यार्थ्यांना शाळेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नाही.

ठळक मुद्देशिक्षण : ७६ हजार विद्यार्थी राहू शकतात ‘आॅनलाईन’ शिक्षणापासून वंचित

जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. आता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ११ हजार १२६ विद्यार्थ्यांना शाळेची घंटा कधी वाजणार, याचे वेध लागले आहेत. २ लाख ४४ हजार ४५० विद्यार्थ्यांच्या कुटुंबात स्मार्टफोन व एवढ्याच विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नाही. त्यांचे शिक्षण या पद्धतीत थांबणार आहे.
कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. ७६ हजार ६६९ विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यास अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण तर थांबणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या २८८९ शाळांपैकी ९६५ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे वर्ग कसे सुरू करायचे, ही समस्या आहे. कोविड उपाययोजनांसाठी २१७६ शिक्षक नियुक्त आहेत. त्यांच्याबाबत अडचण येऊ शकते. एक दिवसाआड शाळा सुरू होऊ शकणाºया शाळा ४३७ आहेत, तर पूर्णवेळ सुरू होऊ शकणाºया १८४२ शाळा आहेत.

कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या अनुषंगाने कोणत्या सुविधा शाळांकडे आहेत वा नाहीत, याबाबत सर्व बीईओंकडून १ ते १२ शाळांची माहिती मागविली होती. त्यानुसार शिक्षण विभागाकडे ही माहिती संकलित करण्यात आली.
- नितीन उंडे
उपशिक्षणाधिकारी

टॅग्स :Schoolशाळा