शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

संत्राचोरांची टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:01 IST

पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, संत्री कुठून आणली, याचे उत्तर तो देऊ शकला नाही. पोलिसांना संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : वाहनासह ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदीदरम्यान संत्राचोरांची नऊ जणांची टोळी जेरबंद केली. मंगळवारी पहाटे अचलपूर ते चांदूर बाजार रोडवर नाका स्थित पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन चारचाकी वाहनांसह साठ कॅरेटमध्ये भरलेल्या संत्र्याचा ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शेतमालाच्या वाढत्या चोऱ्या लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी आरोपींचा शोध लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आरोपींच्या शोधात लागले होते. यासाठी पोलिसांचे एक पथक नियमित रात्रगस्त व नाकाबंदीसाठी नेमण्यात आले.दरम्यान, पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, संत्री कुठून आणली, याचे उत्तर तो देऊ शकला नाही. पोलिसांना संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर तो माल सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास करण्यात आल्याची माहिती पुढे आली. याचवेळी एक साथीदार मागून दुसरे वाहन घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ सीएन.४८८६ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांक थांबवून चालकाची चौकशी केली. त्यानेही संत्राचोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या वाहनातून टोळीचा म्होरक्यासह नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून कलम ४१ (१),( ४) अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीकरिता आरोपींना सरमसपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या आरोपींनी कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याची कबुली दिली असून, अन्य जिल्ह्यातही ही टोळी संत्राचोरी करीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्याकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.यांनी केली कारवाईसदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्यावतीने एपीआय नरेंद्र पेंदोर, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार सुनील तिडके, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे तसेच चालक नितेश तेलगोटे यांनी केली.आरोपींची नावेपोलिसांनी या गुन्ह्यात नूर शाह मोहम्मद शाह (३४), सलीम शाह अयूब शाह (३०), इमरान खान किफायत खान (२८), कलीम शाह अयूब शाह (२७), वारीस बेग जब्बार बेग (४२), फारूक अली सादीक अली (४०), शेख हाफीज शेख हारुण (१८), शेख हारूण शेख मुनाफ (३४), इरफान शाह मोहम्मद शाह (३४) (सर्व रा. बिस्मिल्लानगर) अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Thiefचोर