शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकांना बसणार २०० कोटींचा फटका

By admin | Updated: October 6, 2014 23:04 IST

तालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत.

सुरेश सवळे - चांदूरबाजारतालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत. तालुक्यातील घाटलाडकी, शिरजगाव कसबा, देऊरवाडा, ब्राम्हणवाडा, वणी, विश्रोळी, देऊरवाडा, माधान आदी अनेक गावांमध्ये संत्रा उत्पादक दरवर्षी संत्रा उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल करतात. पण, यंदा अनियमित पावसामुळे व मध्यंतरी बसलेल्या पूर्णा नदीच्या पुराच्या तडाख्याने संत्र्याची नवीन लावलेली झाडे वाहून गेली. तर नदी काठच्या बागांना या अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहाचा मोठा फटका बसला. सततच्या पावसानंतर वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील वाफेमुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळे गळत आहेत. आता झाडांवर उरलेल्या संत्र्यांची वाढ खुंटली असून या लहान संत्रा फळांना बाजारपेठेत भाव नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. १२०० ते १५०० रुपये अल्प दराने ही संत्री विकावी लागत आहेत. पूर्ण वाढ झालेल्या फळाला असून २ हजार ते २२०० रुपये दर मिळतो. मात्र, यंदा हा भाव मिळणार नाही, असे मत येथील संत्रा व्यापारी व्यक्त करीत आहेत. येथील बाजारपेठेतील संत्री केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा सारख्या राज्यात तर जातातच; शिवाय येथील दर्जेदार संत्री परदेशातसुुध्दा जातात. सर्व राज्यातून व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येतात. मात्र, एरवी ५ आॅक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणात संत्र्यांची उलाढाल होत होती. ती परिस्थिती यंदा दिसत नाही.अशातच आंबिया बहाराचेही संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागण्याचे चित्र दिसून येत आहे. एरवी ४०० कोटींची होणारी संत्र्याची उलाढाल यावेळी २०० कोटींच्या आतच आटोपते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे फळगळतीमुळे तालुक्यातील संत्रा उत्पादकांना २०० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांना भविष्यात मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.