शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहारामुळे संत्रा मातीमोल !

By admin | Updated: March 11, 2017 00:04 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

धनादेश अनादरीत : संत्रा उत्पादकावर आर्थिक संकट वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आंबिया बहाराला नोटाबंदीचा फटक ा बसल्यावर आता मृगाचा बहार देखील ‘कॅ शलेस’च्या विळख्यात सापडला असून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. दरम्यान संत्र्याचे भाव कमी होत चाल्याने संत्रा उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. वरूड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर बागायती क्षेत्रात संत्र्याची लागवड करण्यात आली. यापैकी २१ हजार हेक्टरमध्ये फळबागा आहेत. शेतकरी झिजवताहेत उंबरठेवरूड : वर्षातून दोनदा येणाऱ्या संत्र्याला सुरूवातीला नोटबंदी व आता कॅशलेस व्यवहाराचा फटका बसला आहे. आंबिया बहराला पाहिजे तशी किंमत मिळाली नसल्याने मृगबहराच्या संत्र्यातून तूट भरून काढता येईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला होता. व्यापाऱ्यांना संत्राबागा खरेदी केल्यावर त्याबदल्यात धनादेश दिले होते. बँकांमध्ये ‘कॅश’ नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना धनादेशाच्या बदल्यात पैसे मिळू शकत नसल्याचे चित्र आहे. शिवाय व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे नसल्यामुळे त्यांनी दिलेले धनादेश अनादरित होत आहेत. यामुळे पैशासाठी शेतकरी मंडईचे दरवाजे झिजवित असल्याचे चित्र आहे. सरकारच्या ‘कॅशलेस’ व्यवहाराचा फटका शेतकऱ्यांना बसला. विवाहसोहळे, धान्य खरेदी, दवाखान्याचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)संत्र्याचा भाव झाला कमीआंबिया बहार आला असताना नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नव्हता. मृगबहारातील संत्र्याला चांगला भाव मिळतो, याआशेने अनेक व्यापाऱ्यांनी ा बागा जपल्या व चांगले उत्पादन घतले. कॅशने व्यवहार व्हावा असे वाटत असल्याने अनेकांनी धनादेश स्वीकारले नाहीत. आता ‘कॅशलेस’च्या फटक्यामुळे संत्र्याचे भाव कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.