शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल, किराणा दुकानातही गुटख्यांची खुलेआम विक्री

By admin | Updated: May 16, 2016 00:07 IST

राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असताना शहरातील अनेक किरकोळ हॉटेल व किराणा दुकानांमध्ये गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे.

अन्न आयुक्तांवर कारवाई का नाही? : मग अन्न विभागाची गरज काय ?अमरावती : राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असताना शहरातील अनेक किरकोळ हॉटेल व किराणा दुकानांमध्ये गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे. अन्न प्रशासन विभागाच्या डोळ्यांलगत ही विक्री करण्यात येत असून सह. आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांचा आशीर्वाद तर नाही ना? व जर नसेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा का नाही, असा प्रश्न अमरावतीकर विचारत आहेत. अमरवरती जिल्ह्यात गुटख्यांची खुलेआम विक्री होत असताना एफडीएचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. शासनाने मागेल त्यांना शेततळयांची योजना आणली, त्याचप्रमाणे राज्यात गुटखा बंदी असतानाही मागेल त्याला गुटखा ही एफडीएने अंबानगरीत ही योजना सुरू केली असल्याची चर्चा आहे. मात्र एफडीएचे अधिकारी मूग गिळून बसले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचा पाच जिल्ह्यांचा कारभार अमरावतीतून चालते. येथे सहआयुक्त अन्न चंद्रशेखर साळुंखे व सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे हे महत्त्वाच्या पदावरील अधिकारी बसतात. परंतु सर्वत्र राज्यात गुटखा बंदी असताना कुठलीही ठोस कारवाई त्यांनी केलेली नाही. सामान्य जनतेच्याच करातून शासन त्यांना चार अंकी पगार देते हे अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न आता जनताच, विचारत आहे. जर आपल्या कर्तव्याप्रती हे अधिकारी प्रामाणिक नसतील तर अन्न प्रशासन विभागाचे काम काय? अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर अन्न व पुरवठा मंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारायला हवा. आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या एफडीएच्या बेजबाबदार अधिकाऱ्याला अन्न व पुरवठा मंत्री का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न अमरावतीकर आता विचारत आहेत. गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे. नागरिकांना फळे विक्रेते. चक्क मृत्युची विक्री करीत आहेत. कॅल्शियम कार्बाईडसारख्या अत्यंत घातक अशा रासायनिक पदार्थांचा वापर आंबे, केळी, पपई, विकण्यासाठी होत आहे. रासायनिक इंजेक्शनचा टरबूज लाल करण्यासाठी सर्रास वापर होत आहे. चविष्ट सफरचंदवर रासायनिक व्हॅक स लावल्या जात आहे. चायनीजच्या गाड्यांवर नुडल्स व मंच्युरियनसारख्या अन्न पदार्थात, शरीराला हानीकारक असणाऱ्या अजिनोमोटो पावडरचा वापर होत आहे. अन्न व मानदे कायदा २००६ ने ठरवून दिलेल्या कुठल्याही मापदंडाचे पालन खाद्यपदार्थ विक्रेते करीत नाहीत. यावर नियंत्रण ठेवण्याची खरी जबाबदारी ही अन्न व औषधी प्रशासन विभागाची आहे. त्यामुळे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही कारवाया कागदोपत्री दाखविल्या जातात. मात्र नंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. अनेक हॉटेल्समध्ये दूषित पाणी व कमी दर्जाचे अन्न पदार्थ विकली जातात, या अन्न पदार्थांच्या कधी तपासण्या करण्यात येत नाहीत. लोकांना अनेक पकारचे आजार विकले जात असताना एफडीएचे अधिकारी कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वत: येऊन पाहणी करावी. तेव्हाच हा चालू असलेला अमरावतीच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार बाहेर निघेल, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. अन्न व पुरवठा मंत्री अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांच्याकडून विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीकरांना मोठी अपेक्षा आहे. आंबे व इतर फळे पिकविण्यासाठी होत असलेला कॅल्शियम कार्बाईडचा वापर व त्यांतून लहान मुलांसह मोठ्यांना क ॅन्सरसारखे आजार होत आहेत. ही मृत्यूंची विक्री थांबविण्यासाठी आता अमरावतीकरांनीच बाहेर निघावे, अशी अपेक्षा आहे.