शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

्रपाच लाख रुपयांची दारु जप्त

By admin | Updated: September 24, 2015 00:25 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी परतवाडानजीक वडुरा शेतशिवारात बनावट देशी व विदेशी दारुचा साठा गोदामातून जप्त केला.

परतवाड्यातील घटना : एकाच ठिकाणावर दोन विभागाच्या दोन धाडीअचलपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी परतवाडानजीक वडुरा शेतशिवारात बनावट देशी व विदेशी दारुचा साठा गोदामातून जप्त केला. परतवाडा पोलिसांनी ज्या ठिकाणावरुन दीड लाखांचा दारूसाठा जप्त केला तेथे धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने पाच लक्ष रुपयांची दारु पकडली व आरोपीला अटक करण्यात आली.वडुरा शेतशिवारात मंगळवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मध्यप्रदेशात विक्री होत असलेल्या मॅक्डॉल्स, व्हिस्की कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ३६ पेट्या २२४ बॉटल्स व अवैध देशी संत्रा १३० पेट्या तसेच तीन दुचाकी जप्त केल्यात. मुद्देमालास ६ लक्ष ३ हजार २९४ एवढी किंमती आखण्यात आली आहे. यात जवळपास दोन हजार कागदी लेबल बनावट दारुसाठी वापरण्यात असल्याचे आढळून आले. तर मयुर सुभाष कानेकर (२१) जुनी वस्ती कांडली याला अटक करण्यात आली. त्यावर मुंबई दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बनावट लेबल दोन राज्यांत विक्रीगणपती व ईदनिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्रीविरुद्ध मोहीम राबविली. यामध्ये बनावट दारु दोन हजार कागदी लेबल सापडले असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ती विक्री करण्याचे नमुद आहेत. दोन्ही राज्याचा महसूल बुडविण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोपीचा उद्देश असला तरी बनावट दारु विषारीसुध्दा असू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पकडण्यात आलेला आरोपी हा मुख्य सूत्रधार नसून मुख्य आरोपींचा शोेध घेण्याची मोठी जबाबदारी या विभागाची आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाधिकारी सकाळीच धडकलेराज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच लक्ष रुपयांची बनावट दारू पकडण्याची माहिती तत्काळ पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी सकाळी ८ वाजता परतवाडा येथे धडकले. त्यांच्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील विभागीय आयुक्त उषा वर्मा होत्या. ही कारवाई अचलपूरचे निरीक्षक सुबोधकुमार केडिया, शरद लांडगे, दुय्यम निरीक्षक शैलेश अजमिरे, शेख अनिस, शंकर इंदये, शीतलकुमार बेदरकर, राजेश तायकर, रवी राऊ तकर, अरविंद नांदणे, अंकुश काळे, सुमित काळे, जगदीश चव्हाणसह आदी कर्मचाऱ्यांनी केली.