शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पडझड झालेल्या घरांचे एक कोटीचे अनुदान रखडले

By admin | Updated: December 22, 2015 00:15 IST

यंदाच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली.

दिरंगाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली. यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ सप्टेंबर रोजी १ कोटी ४० लाख ६० हजारांचा निधी तालुक्यांना वितरित केला. परंतु तालुकास्तरावर गांभीर्याने न घेतल्याने अद्याप १ कोटी २ लाख ६६ हजार ५३१ रुपयांच्या निधीचे वाटप रखडले आहेत. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात व प्रामुख्याने ४ व ५ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या दोन दिवसांत साधारणपणे ३५० मि.मी. पाऊस पडला. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली. यासाठी जिल्हा प्रशासनाला १ कोटी ४० लाख ६० हजारांचा निधी प्राप्त झाला. पडझड झालेल्या घरांची तलाठी, ग्रामसेवक व पंचायत समिती तसेच बांधकाम विभागाच्या अभियंत्याद्वारा सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने हा निधी ११ सप्टेंबर २०१५ रोजी सर्व तालुक्यांना वितरित केला. साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्याप २ हजार ८३१ घरांच्या पडझडीसाठी तालुका प्रशासनाने निधी वितरित केलेला नाही. सद्यस्थितीत केवळ ३७ लाख ९३ हजार ४३९ हजार रुपयांचे वितरण तालुकास्तरावर झालेले आहे. अनुदान वाटपाची ही केवळ २४ टक्केवारी आहे. अद्याप ७६ टक्के अनुदानाचे वाटप बाकी आहे. यासाठी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना पत्र दिले आहे. या निधीचे वाटप न झाल्यास ३१ मार्च रोजी हा निधी शासनाला समर्पित करावा लागेल. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.