अवैध गांज्यासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST2021-03-04T04:24:08+5:302021-03-04T04:24:08+5:30

अमरावती : राजापेठ पोलिसांनी भानखेडा मार्गावरील हनुमान मंदिराजवळ कारवाई करून दोन जणांच्या ताब्यातून अवैध गांज्यासह १ लाख ६८ हजारांचा ...

One and a half lakh items including illegal cannabis seized | अवैध गांज्यासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गांज्यासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी भानखेडा मार्गावरील हनुमान मंदिराजवळ कारवाई करून दोन जणांच्या ताब्यातून अवैध गांज्यासह १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी राजापेठ पोलिसांनी केली.

चेतन नरेंद्र चव्हाण (१९, रा. सनोरा भिलटेक ता. चांदूर रेल्वे) सौरभ राजेंद्र पैठणकर (२०, रा. साईनाथ कॉलनी ता. चांदूररेल्वे) असे आरोपीचे नाव आहे. दुचाकीवर दोन इसम चांदूररेल्वेमार्गे अमरावतीला येऊन छत्रीतलाव भागातील हनुमान मंदिरात गांजा घेऊन विक्रीकरिता आणत असल्याचे पोलिसांना माहिती मिळताच गस्तीवरील पथकाने आरोपीची झडती घेतली. त्यांच्या ताब्यातून ६१ हजारांचा सहा किलो १०० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल नगदी ४३ हजार व ५० हजारांची दुचाकी असा एकूण १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रशाली काळे व पथकाने केली.

Web Title: One and a half lakh items including illegal cannabis seized