शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार

By admin | Updated: January 10, 2017 00:12 IST

रतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे.

अन्न प्रशासन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : खाद्यतेलाच्या विक्रीसाठी वापरसंदीप मानकर अमरावतीरतनगंज परिसरात खाद्यतेलाच्या जुन्या पिंपांचा बाजार भरतो. येथे ते डब्बे धुतली जातात. त्यानंतर जंग लागलेली पिंपे पुन्हा बाजारपेठेत विक्री केले जात आहे. पुन्हा हे डब्बे रियुज करुन याममध्ये नागरिकांना खाद्यतेल विक्रीचा खुलेआम गौरखधंदा चालतो. परंतु अशा जुन्या पिंपाच्या वापरावर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा असून अशा डब्बयांचा सर्रास वापर करून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात रविवारी स्टिंग केले असता हा गौरखधंदा 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इतवारा बाजारातील अ‍ॅकॅडमिक स्कूलच्या बाजूला रतनगंज परिसरातील काला नागोबा परिसरात हा बाजार भरतो. या बाजारात अनेक व्यवसायिक असतात. शहरातील किराणा दुकानदारांकडून ७ ते ८ रुपयाला हे खाद्यतेलाचे जुने पिंपे विकत घेण्यात येतात. यानंतर हे काला नागोबा परिसरातील अनेक ठिकाणी धुतले जातात. यानंतर त्याच दुकानदारांना हे पिंपे २० ते ३० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. यानंतर दुकानदार ड्रममध्ये आलेले खाद्यतेल या जंग लागलेल्या व जुन्या पिंप्यांमध्ये भरून नागरिकांना खुल्या तेलाची विक्री करण्यात येते. जुन्या पिंप्यांचा वापर करणे हे नियमबाह्य असून अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा किराणा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून या जुन्या पिंप्यांची तपासणी केली, तर जे काय आहे ते सत्य बाहेर निघेल. या धंद्यात अनेक दिवसांपासून सुरु असून याकडे पोलीसांचे व अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. जंग लागलेले व इंनफेक्शन या डब्यांचा पूर्णवापर करण्यात येत असल्याने या पासून नागरिकांना विविध आजार होत आहे. यामुळे पोटाचे आजार व कर्करोग होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. परंतु नागरिकांच्या जिविताशी रोज खाद्यतेल विक्रेते खेळ करी आहेत. पण अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. नालीत धुतले जातात खाद्यतेलाचे पिंपअनेक ठिकाणी खाद्यतेलाच्या पिंपांचे विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे येथे शेकडो पिप्यांचे ढिग , लागलेले निदर्शनास आले आहे. हे पिंपे ज्या ठिकाणी धुण्यात येतात त्या ठिकाणी मोठी नाली आहे. त्या नालीवर डिटरजंट सदर डब्बे धुतल्या जात आहे. त्यामुळे हे घाणे पाणी सुध्दा या डब्यात चिकटते. व त्याच किरकोळ व्यापारी खुले खाद्यतेल भरून ते नागरिकांना विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खुले पिंप विक्रीचा व्यापार थांबविणे गरजेचे झाले आहे. जुन्या पिंपांमध्येच जर खाद्यतेल भरून विक्री करण्यात येत असेल तर अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे.एफडीए गप्प का? शहरात गंज लागलेल्या जून्या पिप्यांमधुन खुल्या खाद्यतेलाची विक्री होत आहे. हे नियमबाह्य असून यामुळे हे तेल नागरिकांच्या खाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हा प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात लोकदरबारात मांडले. लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.जुन्या पिंपांचा वापर केल्याने त्यात जर विशिष्ट प्रकारचे केमिकल राहते. ते खाद्यतेलात मिश्रित झाले तर नागरिकांना विषबाधा होऊ शकते. तसेच संसर्ग झाल्याने व हे अनेकवेळा खाण्यात आल्याने मेंदू, यकृत, हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.- अतूल यादगिरे, कॅन्सर तज्ज्ञ, अमरावती