शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांनी काढली दुर्गम भागात रात्र !

By admin | Updated: June 15, 2014 01:21 IST

अमरावती विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच तालुक्यातील इतर विभागाचे तालुका अधिकारी यांनी काल १३ जून रोजीची रात्र अतिदुर्गम आदिवासी गाव चाळीसटापरी येथे काढली.

खामगाव : अमरावती विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच तालुक्यातील इतर विभागाचे तालुका अधिकारी यांनी काल १३ जून रोजीची रात्र अतिदुर्गम आदिवासी गाव चाळीसटापरी येथे काढली. या मुक्कामामुळे अधिकार्‍यांना अतिदुर्गम भागातील समस्या प्रत्यक्षात जाणून घेता आल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न झाला.
राज्याचे मुख्य सचिव सहारिया यांच्या कल्पकतेतून वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुर्गम भागात मुक्काम करुन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्या व यंत्रणेला कामाला लावावे, या हेतूने नुकतीच एक अभिनव अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. यानुसार काल १३ जूनच्या रात्री अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात ही संकल्पना राबविली. यासाठी विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांच्या आदेशानुसार जळगाव जा.तालुक्यातील अतिदुर्गम आडवळणाच्या जळगाव जा. या शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चाळीसटापरी या १00 टक्के आदिवासी वस्ती वजा गावाची निवड करण्यात आली. संध्याकाळी विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, तहसीलदार चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी गुजेला यांच्यासह इतर विभागीय तालुका अधिकारी असा अधिकार्‍यांचा ताफा गावात दाखल होताच आदिवासींनी त्यांच्या पारंपारिक पध्दतीनुसार या अधिकार्‍यांचे स्वागत केले. त्यानंतर अधिकार्‍यांनी ग्रामस्थांमध्ये मिसळून आपुलकीने त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यानंतर रात्री विजेची व्यवस्था नसल्याने सौरदिव्यांच्या प्रकाशात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांना उद्भवत असलेल्या समस्यांसोबतच राशन कार्ड मिळणे, मतदार यादीत नावनोंदणी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदी मागण्या अधिकार्‍यांसमोर मांडल्या असता येत्या एक महिन्यात राशन कार्ड बनवून देण्याचे तसेच सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहीम अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले. तर वनजमिनीबाबत पट्टे देण्याचा विषय तांत्रिक अडचण असल्याने सोडविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. भिंगारा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या चाळीसटापरी येथील या ग्रामसभेला भिंगारा व कहुपट्टा येथील आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होत्या. यानंतर विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांच्यासह जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर व इतर अधिकार्‍यांनी आदिवासींनी तयार केलेले मिसळचे वरण व मक्याची भाकरी असे आदिवासींसोबत सहभोजन घेतले. तर रात्री आदिवासींच्या झोपडीतच मुक्काम केला. तर आज १४ जून रोजी सकाळी भिंगारा या आदिवासी गावात जावून तेथील समस्या जाणून घेतल्या. या दौर्‍यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सहकार्य लाभले.
पूर्वीच्यावेळी राजे महाराजे आपल्या प्रजेमध्ये राजा म्हणून न जाता तेथील समस्या जाणून घेत त्याच धर्तीवर राबविण्यात येणार्‍या या ह्यअधिकार्‍यांचा मुक्काम ग्रामीण भागातह्ण या संकल्पनेमुळे शासनासोबतच प्रशासन सुध्दा आपल्या समस्यांबाबत जागृत असल्याची भावना आदिवासींमध्ये निर्माण झाली. अधिकारी आपल्या गावात आल्याचा त्यांना आनंद झाला होता.