प्रकाश आंबेडकरांसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST2020-12-28T04:07:44+5:302020-12-28T04:07:44+5:30

धामणगाव रेल्वे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

Offensive writing about Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण

प्रकाश आंबेडकरांसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण

धामणगाव रेल्वे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन वजा तक्रार दत्तापूर पोलीस ठाण्यात शनिवारी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू बोरकर, जिल्हा सचिव अशोक मोहोड, शुभम हेंडवे, रवी भोकरे, नाना शिंगणापुरे, अशोक खोब्रागडे, जयपाल बांते, सुनील पाटील, राहुल हाडे, मंगेश तायडे उपस्थित होते. तिवसा येथेदेखील ठाणेदारांना त्याबाबत निवेदन देऊन संबंधित युवतीविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितच्यावतीने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते, सतीश यावले, सुमित सोनोने, संदीप मकेश्वर, प्रवीण निकाळजे, राहुल गोपाळे, बबलू मुन्द्रे, राजकुमार आसोड़े, गजानन आसोडे, धनंजय आसोडे, भाष्कर आसोडे, सम्यक हगवने, रोशन खडसे उपस्थित होते.

Web Title: Offensive writing about Prakash Ambedkar