शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : वर्धा जिल्ह्यात थोपविली कन्हान रेतीची वाहने अमरावती : जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली. वाळूमाफियांचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १९२ रेतीघाटांमधून दोन ब्रासपेक्षा अधिक रेतीची वाहतूक व नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेतीची १० ब्रासपेक्षा अधिक बेधूंद वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एकाच आठवड्यात चार नागरिकांचा बळी गेला. मात्र, महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाद्वारा या वाहनांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने हे वाळूमाफिया मस्तवाल झाले आहेत. 'ओव्हरलोड' वाहतुकीमुळे वाळूघाटालगतच्या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक गावांमध्ये तर शेतकऱ्यांना वहिवाटीचे रस्तेच उरले नाहीत. अनेक नवीन रस्त्यांची या जड वाहतुकीने पुरती वाट लागली आहे. अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीमुळे दररोज लाखोंच्या महसुलाची खुलेआम चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाचे बेपर्वा धोरण चीड आणणारे होते. याविषयीचे सविस्तर वृत्त मंगळवारच्या अंकात प्रकाशित होताच महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गंभीर दखल घेऊन रेतीवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी व कुठलाही मुलाहिजा न करता धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. वाळूमाफियांची सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तिवसा येथे रात्रंदिवस तपासणी सुरु आहे. त्यातप्रमाणे सर्व तालुक्यांत भरारी पथकांनी वाळू वाहतुकीची तपासणी करून कारवाईचे आदेश देण्यात आले.वाळूमाफियांचे धाबे दणाणलेअमरावती : भरारी पथकालादेखील कडक निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या महसूल विभागाच्या धडक मोहिमेमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. रेतीघाटातून येणारे प्रत्येक वाहन अगदी नियमानुसार दोन ब्रास रेती घेवून निघत आहे. कन्हान रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारी वाहने वर्धा जिल्ह्यात कारंजा परिसरात थोपवून धरली आहेत. ही वाहने छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रविष्ट होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात सर्व ठिकाणी महसूल, पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांची तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.