शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतिष्ठानांना टाळे लावणार

By admin | Updated: April 30, 2015 00:16 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी आता शहरातील प्रतिष्ठानांना टाळे लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला आयुक्तांनी दिले आहे.

व्यापाऱ्यांना इशारा: आयुक्तांचे एलबीटी विभागाला निर्देशअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी आता शहरातील प्रतिष्ठानांना टाळे लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला आयुक्तांनी दिले आहे. नोटीस बजावणे किंवा सूचना देणे पुरेसे झाले असून थेट कारवाई करुन कर बुडव्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी एलबीटी विभागाने चालविली आहे.एलबीटी विभागाचे अधीक्षक सुनील पडके यांनी यापूर्वी नोटीस बजावण्यात आलेल्या प्रतिष्ठानांची यादी तयार करण्यास प्रारंभ केला आहे. विशेषत: जकात करानुसार एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना २१ महिन्यांची फरकाची रक्कम वसूल करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १० मे नंतर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे स्वत: एलबीटी वसूल करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याने एकूणच अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे एलबीटीची मोठी रक्कम थकीत आहे, अशा प्रतिष्ठानांना टाळे लावण्याची कारवाई होणार आहे. एलबीटी निरीक्षकांनी प्रतिष्ठानाचे सर्चिंग केल्यानंतर सदर व्यापाऱ्यांना डिमांड नोटीस बजावली असेल तर ती रक्कम त्वरित भरणे अनिवार्य राहिल. अन्यथा विभागाने कारवाई केल्यास दंडात्मक रक्कम वसूल करण्याची नियमावली आहे. सुमारे पाचशे व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महापालिका उत्पन्न वाढीसाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असा पवित्रा आयुक्त गुडेवार यांनी घेतला आहे. ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी नोंदणी अथवा कर भरलाच नाही, अशांवर फौजदारी दाखल करण्याची तयारी आहे. येथील एमआयडीसी असोशियन, चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली असता त्यांनी व्यापाऱ्यांना फार प्रतिसाद दिला नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)आयुक्त गुडेवार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. तत्कालीन आयुक्तांनी पाठविलेल्या दर कमी करण्याच्या प्रस्तावावर शासन स्तरावर फाईल फिरते आहे. राज्य शासन एलबीटी फरकाची २१ महिन्याची रक्कम माफ करेल, अशी आशा आहे. मुंबईला जाऊन तो प्रश्न सोडवू.- विजय जाधव,अध्यक्ष, एमआयडीसी असोशियन.१ जुलै २०१२ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत जकात करानुसार भरण्यात आलेल्या एलबीटी फरकाची रक्कम भरावी, यासाठी नोटीशी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. महापालिका आयुक्तांना १० मे पर्यंत अवधी मागितला आहे.- घनशाम राठी, सचिव, चेंबर्स आॅफ कॉमर्स.